शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विचारांमधील अंतराने फूट, पण चिंता नको, सत्ता पुन्हा येईल! शरद पवारांचा समर्थकांना विश्वास

By राजू इनामदार | Updated: June 10, 2025 16:16 IST

राज्याची, देशाची स्थिती चिंताजनक असून अशा वेळी सर्वांना बरोबर घेत काम करण्याची आपली जबाबदारी आहे

पुणे: मूलभूत विचारांमध्ये अंतर पडले म्हणून फूट पडली आहे, पण चिंता करू नका, विचारांबरोबर राहा, जनतेशी बांधिलकी ठेवा, सत्ता आपोआप येईल, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी जमलेल्या समर्थकांना विश्वास दिला. पक्षातून बाहेर गेलेल्या नेत्यांपैकी कोणाचेही थेट नाव घेणे त्यांनी टाळले.

बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी (दि.१०) झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे तसेच पक्षाचे सर्व खासदार, आमदार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पवार यांच्यासह सर्वांचा सत्कार करण्यात आला.
अर्ध्या तासाच्या भाषणात पवार यांनी पक्षातून बाहेर पडलेल्यांपैकी एकाचेही नाव घेतले नाही. ते म्हणाले, पक्षस्थापनेला २६ वर्षे झाली. जनतेने काम करण्याची संधी दिली. सर्वसामान्यांमधूनही राज्यकर्ते तयार करता येतात, हे पक्षाने दाखवून दिले. इतकेच नाही तर आर. आर. आबा व अन्य अनेकांनी राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक जीवनावर परिणाम करतील, असे अनेक चांगले निर्णय घेतले. यातून पक्षाला प्रतिष्ठा मिळाली, पक्ष पुढे गेला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्तविक केले. त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी या अंकाचे प्रकाशन झाले. पवार यांना आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन बरोबर असलेले त्यांचे तैलचित्र भेट दिले.

फुट पडली मात्र मी चिंता करत नाही,आपण एकसंध राहिलो, जनतेच्या कामाशी बांधिलकी ठेवली तर सत्ता आपोआप येईल. राज्याची, देशाची स्थिती चिंताजनक आहे. अशा वेळी सर्वांना बरोबर घेत काम करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यासाठी कर्तृत्ववान चेहऱ्यांना संधी देऊ. यातून नव्या नेतृत्वाची फळी उभी राहील आणि पुन्हा सत्ता मिळेल. -शरद पवार

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडी