दिवेकर, कॅनन क्रिकेट क्लबची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:11 IST2021-02-27T04:11:34+5:302021-02-27T04:11:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक १२ व १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ...

Divekar, Canon Cricket Club | दिवेकर, कॅनन क्रिकेट क्लबची आगेकूच

दिवेकर, कॅनन क्रिकेट क्लबची आगेकूच

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक १२ व १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत कॅनन क्रिकेट क्लब, दिवेकर क्रिकेट अकादमी या संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

निगडीतल्या मदनलाल धिंग्रा मैदानावरील स्पर्धेत पहिल्या सामन्यात दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने परंदवळ क्रिकेट अकादमी संघाचा ४२ धावांनी पराभव करून दुसरा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने १५ षटकांत २ बाद १३७ धावा केल्या. यात संतोष चौहानने ४३ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ६६ धावा, साई बोऱ्हाडेने नाबाद ३५ धावा करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

याच्या उत्तरात परंदवळ क्रिकेट अकादमी संघाचा डाव १५ षटकांत २ बाद ९५ धावांवर संपुष्टात आला. यात सर्वेश वाघमारे (५४ धावा), रुद्र जयभाय (२४ धावा) यांची लढत अपुरी ठरली. दिवेकर क्रिकेट अकादमीकडून आर्यन यादव (१-१८), आदित्य कापरे (१-२२) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात पार्थ डिम्बले (२-११)च्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर कॅनन क्रिकेट क्लब संघाने तिकोने क्रिकेट गुरुकुल संघाचा ७ गडी राखून पराभव केला.

Web Title: Divekar, Canon Cricket Club