शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांमध्ये निरुत्साह

By admin | Updated: January 19, 2015 01:54 IST

जिजामाता हॉस्पिटल प्रभाग (४३) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचे मतदान रविवारी शांततेत झाले. मात्र, मतदारांमध्ये कमालीचा निरूत्साह जाणवला

पिंपरी : जिजामाता हॉस्पिटल प्रभाग (४३) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचे मतदान रविवारी शांततेत झाले. मात्र, मतदारांमध्ये कमालीचा निरूत्साह जाणवला. ३७.०२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी सकाळी मतमोजणी होणार आहे. सकाळी साडेनऊपर्यंत निकाल लागेल.विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसचे नगरसेवक गौतम चाबुकस्वार यांनी पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला व पिंपरी विधानसभा मतदार संघातून निवडूण आले. जिजामाता रूग्णालय प्रभागातून चाबुकस्वार हे नगरसेवक म्हणून निवडूण आले होते. त्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहिर करण्यात आली होती. त्याचे मतदान आज झाले. प्रभागात २४ मतदान केंद्रांचा सोय केली होती. पोलीस बंदोबस्तही कडक ठेवण्यात आला होता. केंद्रांवर १७४ निवडणूक कर्मचारी नियुक्त केले होते. सकाळी साडेसातला मतदान सुरू झाले. मतदानासाठी येणाऱ्यांचे प्रमाण तुरळक होते. संवेदनशीन मतदान केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले. तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. केंद्राच्या शंभर मीटर अंतराबाहेर कार्यकर्ते मतदारांना वोटरस्लीप साठी मदत करीत होते. सकाळच्या वेळात कमालीचा निरूत्साह दिसून आला. साडेनऊपर्यंत ३.४३ टक्के मतदारांनी मतदान केले. काही केंद्रांवर शुकशुकाट होता. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना निवांत बसावे लागले. दुपारी बारापर्यंत ७.७८ टक्के मतदान झाले. बारा ते साडे तीनपर्यंत २४.२२ टक्के मतदान झाले. दुपारी टक्केवारी काही प्रमाणात वाढल्याचे दिसले. शेवटच्या दोन तासांत रांगा लावून मतदान केले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३७.०२ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)