Shirur: ट्रकखाली झोपल्याचे लक्षात आले नाही; निष्काळजीपणामुळे तरुणाचा चिरडून मृत्यू; चालकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 11:21 IST2026-03-26T11:21:06+5:302026-03-26T11:21:45+5:30

अपघातानंतर चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचेही समोर आले आहे

Didn't realize he was sleeping under the truck; young man crushed to death due to negligence; Driver charged | Shirur: ट्रकखाली झोपल्याचे लक्षात आले नाही; निष्काळजीपणामुळे तरुणाचा चिरडून मृत्यू; चालकावर गुन्हा

Shirur: ट्रकखाली झोपल्याचे लक्षात आले नाही; निष्काळजीपणामुळे तरुणाचा चिरडून मृत्यू; चालकावर गुन्हा

शिरूर : तालुक्यातील सरदवाडी हद्दीत राजस्थान ढाब्याच्या पार्किंगमध्ये ट्रकखाली झोपलेल्या तरुणाचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश आसाराम साठे (वय २९, रा. जालना) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी ट्रक क्रमांक (टीएन ८८ - एम १८६४) चालविणारा बालसुब्रह्मण्यम मुर्गेशन (रा. तिरुचिरापल्ली, तामिळनाडू) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुर्गेशन याने पहाटे ट्रक सुरू करून पुढे घेतला. त्यावेळी ट्रकखाली योगेश साठे झोपले असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. निष्काळजीपणे वाहन चालविताना ट्रकचे मागील चाक साठे यांच्या कंबरेखालून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांनी फिर्याद दिली असून, मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title : शिरूर: ट्रक के नीचे सोने से युवक की मौत; ड्राइवर पर मामला दर्ज

Web Summary : शिरूर में ट्रक के नीचे सो रहे एक युवक को कुचल दिया गया, जिससे उसकी मौत हो गई। ड्राइवर, जिसने उसे नहीं देखा, लापरवाही और घटनास्थल से भागने के लिए बुक किया गया है। जालना का रहने वाला पीड़ित गंभीर रूप से घायल हो गया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Shirur: Negligence Kills Sleeping Youth Under Truck; Driver Booked

Web Summary : A youth sleeping under a truck in Shirur died after being run over. The truck driver, who didn't notice him, has been booked for negligence and fleeing the scene. The victim, from Jalna, was fatally injured. Police are investigating.