शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

दाट धुक्यामुळे पुण्यातील विमान उड्डाणांवर परिणाम   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 20:40 IST

सकाळी धुक्यामुळे पुण्यात येणारी दोन विमाने मुंबईकडे वळविण्यात आली. तर ७ ते ८ विमानांचे उड्डाण व आगमन विलंबाने झाले. त्यामुळे सकाळी विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली होती.

पुणे : काही दिवसांपुर्वी नवी दिल्ली येथील प्रदुषणामुळे विमानसेवेवर विपरीत परिणाम झाला होता. आता पुण्यातील दाट धुक्यामुळेही विमान उड्डाणांवर परिणाम होऊ लागला आहे. शनिवारी (दि. ९) सकाळी धुक्यामुळे पुण्यात येणारी दोन विमाने मुंबईकडे वळविण्यात आली. तर ७ ते ८ विमानांचे उड्डाण व आगमन विलंबाने झाले. त्यामुळे सकाळी विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली होती.          नवी दिल्ली येथील प्रदुषणामुळे दोन-तीन दिवस विमान वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुण्यातून दिल्लीला ये-जा करणाऱ्या काही विमानांना १ ते ४ तासांपर्यंत विलंब झाला होता. त्यामुळे प्रवाशांना खुप मनस्ताप सहन करावा लागला होता. पुन्हा पुण्यातील धुक्यामुळे प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस सध्यातरी थांबला आहे. शहरातील तापमानात घट होऊ लागली असून सकाळी धुके पडू लागले आहे. शनिवारी सकाळी ६ वाजल्यानंतर पडलेल्या दाट धुक्याचा विमान उड्डाणांवर परिणाम झाला. धुक्यामुळे काही अंतरावरील दिसणेही कठीण झाले होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पुणे विमानतळावरून विमान उड्डाणे थांबविण्यात आली. तसेच बाहेरून येणाऱ्या काही उड्डाणांनाही विमानतळावर उतरण्यास मनाई करण्यात आली.       धुक्यामुळे पुण्यात सकाळी ६.५० वाजता चेन्नई (एसजी ५३०) आणि सकाळी ६.५५ वाजता बेंगलुरू (जी८ २८३) येथून येणारी विमाने मुंबईकडे वळविण्यात आली. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दोन्ही विमाने काही अंतराने पुणे विमानतळावर दाखल झाली. तसेच काही विमानांना विलंब झाल्याची माहिती विमानतळ संचालक अजय कुमार यांनी दिली. पुण्यातून उड्डाण करणारे बेंगलुरू, नागपुर व दिल्लीकडे जाणाऱ्या तीन विमान उड्डाणांना विलंब झाला. तर बेंगलुरू आणि दिल्लीतून येणाऱ्या विमानाचे आगमन उशिराने झाले.

कोलकाताची उड्डाणे रद्द

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले बुलबुल चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगालला बसणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. ८) सायंकाळी ६ ते रविवारी (दि. ९) सकाळी ६ यावेळेत कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. पुण्यातून या कालावधीत तीन विमाने कोलकाताला जातात. तर चार विमाने कोलकातामधून पुण्यात येतात. विमान कंपन्यांनी रद्द केलेल्या किंवा अन्य विमानतळाकडे वळविण्यात आलेल्या उड्डाणांसाठी परतावा तसेच तिकीट रद्द करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

टॅग्स :airplaneविमानdelhiदिल्लीnagpurनागपूरBengaluruबेंगळूर