शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

फाटक्या झोळीलाही दिवाळीचे स्वप्न!

By admin | Updated: November 8, 2015 03:04 IST

पोटासाठी पाठीवरचं जगणं घेऊन फिरणं एवढंच त्यांना ठाऊक. ना घर ना दार. धरणीमाईच्या कुशीत शिरून आकाशाच्या छताखाली पडायचं, हेच वास्तव्य आणि हाच विसावा.

- हिनाकौसर खान पिंजार/प्रज्ञा केळकर-सिंग , पुणेपोटासाठी पाठीवरचं जगणं घेऊन फिरणं एवढंच त्यांना ठाऊक. ना घर ना दार. धरणीमाईच्या कुशीत शिरून आकाशाच्या छताखाली पडायचं, हेच वास्तव्य आणि हाच विसावा. पुढच्या दिवसाचा ठिकाणाही ज्यांना ठाऊक नाही...त्यांच्यासाठी दिवाळीचा सण तो काय असेल? ज्या दिवशी हाता- पोटाची भेट तिच दिवाळी, तरीही आपल्या फाटक्या झोळीची खंत न बाळगता आपल्या पोराबाळांनाही दिवाळीचे कपडे आणि खाऊ मिळावा, यासाठी कष्टकरी शहरातील रस्त्यांवर अंगमेहनत करताना दिसत आहेत.आपापले गाव-पाड्या, वस्ती सोडून शहरात ठिकठिकाणच्या फुटपाथवर, रस्त्यावर काही कुटुंबांनी आपलं ‘घर’ मांडलेले दिसेल. पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून कुटुंबच्या कुटुंबं येऊन शहरातल्या गर्दीत मिसळतात. आज इथे, तर उद्या पुन्हा कुठेतरी. त्यांच्याच शब्दांत सांगायचे, तर ‘सीझनप्रमाणे’. पाठीवर जगणं घेऊन फिरणाऱ्या या कुटुंबातही दिवाळीचे दिवे पेटतात का? चिवडा-चकली-करंजी असते यांच्या दिवाळीफराळात? की अंधातरित वर्तमान आणि अंधारमय भविष्य असणाऱ्या, या माणसांसाठी दिवाळीचं काय सोयरसुतक? ‘दिवाली हम भी मनायेंगे ना, जैसे सब मनाते है. पटाखे जला देंगे और क्या?’ सोनी, खलबत्त्याच्या पाटावर लाल मिरचीचे वाटण वाटत बोलत होती. मूळची दिल्लीची. अकराव्या वर्षी लग्न झाले आणि संसाराला जुंपली. नवरा मध काढायचं काम करतो. संध्याकाळी अंधार पडण्या आधी स्वयंपाक करण्यासाठी तिची धांदल सुरू आहे. जन्मापासून रस्त्यावरच ती जगलीये. शाळा कधी पाहिली नाही ना पाहावीशी वाटली. आज इथे, तर उद्या अन्य कुठे. भटकण्याविषयी आणि रस्त्याच्या कडेलाच संसार मांडण्याविषयी तिला खंतच नाही. ती म्हणते, नवरा काम करतो, मुले थोडी मोठी झाली की काही ना काही कामधंदे करतात. स्थैर्यच नाही, तर शाळेत कुठून जाणार? कपडे-पैसे जमले तर नवे कपडे घेऊ, नाहीतर कोणी दिले तर घालू. फराळ वगैरे काही बनवत नाही. ज्या दिवशी चांगले जेवायला मिळते तीच आमची दिवाळी! वाटण वाटणाऱ्या तिच्या हाताची लालबुंद धग आमच्याही जिव्हारी लागली.