शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन क्वीनचे रुपडे पालटणार : लवकरच एलएचबी डबे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 07:00 IST

पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या या गाडीमध्ये डायनिंग कार असल्याने प्रवाशांची या गाडीला विशेष पसंती असते..

ठळक मुद्देडायनिंग कारही असणार नव्या रुपातभारतीय रेल्वेसह प्रवाशांमध्ये लोकप्रिय असलेल्या डेक्कन क्वीनचे ९० वर्षात पदार्पणलवकरच एलएचबी प्रकारातील डबे असलेली गाडी प्रवाशांच्या सेवेत रुजु होणार नव्या रुपातील ही गाडी पुढील एक-दोन महिन्यात दाखल होण्याची शक्यता दोन महिन्यांपासून पुल-पुश तंत्रज्ञानाची चाचणी

पुणे : 'दख्खनची राणी' म्हणडे डेक्कन क्वीनचे रुपडे लवकरच पालटणार आहे. ही गाडी लिंके हाफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डब्यांची करण्यात येणार असून त्यामध्ये नव्या रूपातील डायनिंग कारही जोडली जाणार आहे. दोन्ही बाजूला इंजिन असलेल्या या गाडीमुळे पुणे-मुंबई दरम्यानचा कालावधीही कमी होणार आहे. भारतीय रेल्वेसह प्रवाशांमध्ये लोकप्रिय असलेल्या डेक्कन क्वीनने दि. १ जुन रोजी ९० वर्षात पदार्पण केले. पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या या गाडीमध्ये डायनिंग कार असल्याने प्रवाशांची या गाडीला विशेष पसंती असते. डायनिंग कार असलेली ही देशातील एकमेव गाडी असल्याने रेल्वेकडूनही गाडीची विशेष काळजी घेतली जाते. या गाडीच्या डब्यांना असलेल्या सध्याचा निळा व पांढरा रंगही वेगळा असल्याने गाडीची ओळख लगेचच पटते. आता हे डबे नव्या रुपात येणार आहेत. लवकरच एलएचबी प्रकारातील डबे असलेली गाडी प्रवाशांच्या सेवेत रुजु होणार आहे. विशेष म्हणजे पुर्वीच्या गाडीला असलेली डायनिंग कारची सुविधाही कायम ठेवली जाणार आहे. उलट नव्या रुपातील डायनिंग कार प्रवाशांसाठी आणखी आकर्षक असेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. नव्या रुपातील ही गाडी पुढील एक-दोन महिन्यात दाखल होण्याची शक्यता आहे.एलएचबी गाडीला दोन्ही बाजुला इंजिन आहे. सध्या कर्जत ते लोणावळ्यादरम्यान घाटात गाडीला मागील बाजुला इंजिन जोडावे लागते.लोणावळ्यात आल्यानंतर पुन्हा हे इंजिन वेगळे केले जाते. यामध्ये खुप वेळ जातो. त्यामुळे सध्या या गाडीला सव्वा तीन तासांचा वेळ लागतो.एलएचबी ला दोन्ही बाजूला इंजिन असल्याने घाटातील वेळ वाचणार आहे. या गाडीला पुलपुश तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. त्यामुळे गाडीचा वेगही वाढणार आहे. सध्याचा गाडीचा रंगही कायम ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे. रेल्वे मंडळाकडून यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सध्या पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सहा गाड्यांपैकी केवळ इंटरसिटी गाडीला एलएचबी कोच असून दोन महिन्यांपासून पुल-पुश तंत्रज्ञानाची चाचणीही घेतली जात आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी दिली.------------------डेक्कन क्वीनला एलएचबी कोच जोडले जाणार आहेत. तसेच डायनिंग कारही कायम राहणार आहे. मात्र, नव्या रूपातील गाडी कधी धावणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अजूनपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.- वरिष्ठ रेल्वे अधिकारी

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीMumbaiमुंबई