शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मजूर महिलेचा मृत्यू

By admin | Updated: September 25, 2015 01:07 IST

पिंपळे सौदागर येथे ‘झुलेलाल टॉवर’ या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या खाली काम करीत असलेल्या मजूर महिलेच्या डोक्यात सातव्या मजल्यावरून लाकडी वासा पडल्याने गंभीर जखमी होऊन तिचा

पिंपरी : पिंपळे सौदागर येथे ‘झुलेलाल टॉवर’ या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या खाली काम करीत असलेल्या मजूर महिलेच्या डोक्यात सातव्या मजल्यावरून लाकडी वासा पडल्याने गंभीर जखमी होऊन तिचा बुधवारी मृत्यू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव शतरूपा श्यामलाल यादव (वय ३२) असे आहे. पोलिसांनी साईटवर जाऊन पाहणी केली. मात्र, बिल्डरच्या दबावामुळे पोलिसांकडून दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पिंपळे सौदागर येथे एका बांधकाम व्यावसायिकाच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास इमारतीच्या खाली वाळू चाळण्याचे काम मजूर महिला करत होती. अचानक महिलेच्या डोक्यावर सातव्या मजल्यावरून लाकडी वासा पडला. त्याच ठिकाणी ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सकाळी साडेनऊच्या सुमारास घटना घडली; मात्र पोलिसांना याबद्दल दुपारपर्यंत काहीच माहिती नव्हती. गोविंद यशदा चौकाजवळ अपघात झाला असून, त्यात महिला जखमी झाल्याची अफवा सर्वत्र पसरण्यात आली. एवढेच नाही, तर महिलेच्या नातेवाइकांनाही याबाबत गोपनीयता बाळगण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे नेमके काय घडले हे कोणालाही समजू शकले नाही. पिंपळे सौदागरचे पोलीससुद्धा नेमकी घटना कोठे घडली याचा शोध घेत होते. दुपारी पोलिसांनी वायसीएम रुग्णालय, तसेच शवागार या ठिकाणी चौकशीसाठी धाव घेतली. त्यानंतर सायंकाळी पोलिसांना प्रत्यक्ष घटना काय घडली, कोठे घडली, याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतरही महिलेचे नातेवाईक पोलिसांना खरी माहिती देण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारणा केल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली.(प्रतिनिधी)