शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू

By admin | Updated: July 17, 2014 03:20 IST

महापालिकेने राबविलेल्या घरकुल प्रकल्पातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून निकिता चंद्रकांत निसर्गंध (वय १५, रा. कुलस्वामिनी सोसायटी, चिखली) या मुलीचा करुण अंत आला

पिंपरी : महापालिकेने राबविलेल्या घरकुल प्रकल्पातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून निकिता चंद्रकांत निसर्गंध (वय १५, रा. कुलस्वामिनी सोसायटी, चिखली) या मुलीचा करुण अंत आला. ही घटना बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास चिखली येथील कुलस्वामिनी हौसिंग सोसायटी येथे घडली. या प्रकाराने घरकुल परिसरात शोककळा पसरली आहे. निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक-पाटील यांनी दिलेली माहिती अशी, सकाळी बाथरूमध्ये पाय घसरून पडल्याने निकिता जखमी झाली होती. त्यामुळे आईने तिला शाळेत जाऊ नको, असे सांगितले होते. सकाळी आई धुणी-भांड्याची कामे करण्यासाठी बाहेर गेल्याने निकिता घरात एकटीच होती. पाऊस येऊ लागल्याने गॅलरीत वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी ती गेली. त्या वेळी तोल जाऊन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून ती खाली पडली. डोक्यास गंभीर मार लागला. त्यामुळे तिला वायसीएम रुग्णालयात त्वरित दाखल केले. मात्र डॉक्टरांनी ती मृत झाल्याचेजाहीर केले. निकिताच्या नातेवाइकांनी यामागे घातपात असल्याची शक्यता पोलिसांकडे व्यक्त केली आहे. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून, तपासात वेगळे काही निष्पण्ण झाल्यास तसा गुन्हा दाखल केला जाईल.’’ निसर्गंध कुटुंब दीड महिन्यापूर्वीच येथे राहावयास आले होते. निकिता स्पाईन रोड येथील महापालिकेच्या सी. के. चावला स्कूलमध्ये नववीत शिकत होती. आई धुणी-भांड्याचे काम करते. तिच्या मागे आई, २ बहिणी व २ भाऊ असा परिवार आहे. या घटनेने घरकुल प्रकल्प परिसरात शोककळा पसरली आहे.(प्रतिनिधी)