इंदापूर बाजार समिती सभापतीपदी दत्तात्रय फडतरे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:11 IST2021-01-23T04:11:14+5:302021-01-23T04:11:14+5:30

गुरुवार (दि.२१) रोजी इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये सभापतिपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक जे. पी. गावडे ...

Dattatraya Phadtare unopposed as Indapur Market Committee Chairman | इंदापूर बाजार समिती सभापतीपदी दत्तात्रय फडतरे बिनविरोध

इंदापूर बाजार समिती सभापतीपदी दत्तात्रय फडतरे बिनविरोध

गुरुवार (दि.२१) रोजी इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये सभापतिपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक जे. पी. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. याबैठकीत दत्तात्रय फडतरे यांची एक मताने सभापतीपदी निवड करण्यात आल्याचे अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक यांनी जाहीर केले.

यावेळी माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे व उपसभापती तथा आमदार यशवंत विठ्ठल माने यांनी बाजार समितीच्या माध्यमातून राबविलेल्या शेतकरीभिमुख विविध योजना व उपक्रम अशा केलेल्या उत्तम कागगिरीबद्दल संचालक मंडळाने त्यांचा व नवनिर्वाचित सभापती दत्तात्रय फडतरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नूतन सभापती फडतरे म्हणाले की, आगामी काळात अप्पासाहेब जगदाळे, आमदार यशवंत माने व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने इंदापूर बाजार समितीचे कामकाज करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

यावेळी बाजार समितीचे संचालक आमदार यशवंतराव माने, तज्ज्ञ संचालक मधुकर भरणे, संतोष वाबळे, दत्तात्रय सपकळ, शिवाजी इजगुडे, संग्रामसिंह निंबाळकर, अनिल बागल, गणेशकुमार झगडे, निर्मला रणमोडे, स्वाती सपकळ, रोहित मोहोळकर, सचिन देवकर, सुभाष दिवसे, मेघ:शाम (नाना) पाटील, महावीर गांधी, भानुदास सपकळ आदी उपस्थित होते.

_______________________________________

२२ इंदापूर

दत्तात्रय फडतरे यांचा सत्कार करताना अप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने संचालक मधुकर भरणे व इतर.

Web Title: Dattatraya Phadtare unopposed as Indapur Market Committee Chairman