दत्तात्रय भेगडे यांची बस असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:31+5:302021-07-20T04:08:31+5:30

पिंपरी चिंचवड बस ऑनर्स असोसिएशनची नुकत्याच झालेल्या कोअर कमिटी मिटिंगच्या बैठकीत एक मताने निर्णय घेऊन दत्तात्रय भेगडे यांची अध्यक्षपदी ...

Dattatraya Bhegade elected as President of Bus Association | दत्तात्रय भेगडे यांची बस असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

दत्तात्रय भेगडे यांची बस असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

googlenewsNext

पिंपरी चिंचवड बस ऑनर्स असोसिएशनची नुकत्याच झालेल्या कोअर कमिटी मिटिंगच्या बैठकीत एक मताने निर्णय घेऊन दत्तात्रय भेगडे यांची अध्यक्षपदी निवड केली. तसेच उपाध्यक्ष- भालचंद्र उर्फ बाळासाहेब बोराटे,

कार्याध्यक्ष- दीपक कलापुरे, सचिव- बंटी भालेकर,

खजिनदार - दशरथ पानमंद तर सल्लागार- काळूराम गायकवाड, प्रमोद बागलाने, देवदत्त रावल यांची निवड करण्यात आली.

बस वाहतूक व्यवसायिकांना न्याय मिळवून देणे, बँका, फायनान्स कंपन्या यांच्याकडून वारंवार होणारा त्रास कमी करणे, परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळवून देणे, परिवहन कर व वाहन विमा यामध्ये सवलत मिळवून देणे, मिळालेल्या संधीचे सोने करत असताना वाहनधारक व्यवसाय बंधूंना या कठीण काळातून बाहेर काढून मदत करणे व पुनर्वसन करणे हीच आपली जबाबदारी असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

--------------------------------------------------------

१९ चाकण भेगडे

Web Title: Dattatraya Bhegade elected as President of Bus Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.