शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra lockdown: पुण्यात संचारबंदी फक्त कागदावरच! प्रमुख चौकात गर्दीचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 11:54 IST

चौकांमध्ये बॅरिकेड्स, पण पोलीस नाहीत

ठळक मुद्देदेशात येणाऱ्या दहा जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्येत पुणे २ नंबरवर

पुणे: राज्यात कोरोनाचा विळखा अत्यंत घट्ट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. परंतु राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या पुण्यात संचारबंदी कागदावरच असल्याचे चित्र दिसून आले आहे. 

काल रात्री ८ नंतर संचारबंदीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने आज पहिल्या दिवशी पुण्यातील प्रमुख रस्ते आणि चौक यांची पाहणी केली. अत्यंत खेदजनक चित्र पाहणीतून दिसून आले आहे. कालच देशात कोरोना रुग्णसंख्येने २ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर हजाराहूनही अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशात महाराष्ट्रात रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. तर पूर्ण देशात येणाऱ्या दहा जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्येत पुणे २ नंबरवर आहे. तरीही पुण्यातील नागरिक काही ना काही कारणाने बाहेर पडत असलेले पहायला मिळाले.शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन, कर्वे रोड लक्ष्मी, महात्मा गांधी रस्ता अशा अनेक रस्त्यांवर सकाळपासूनच गर्दी दिसून आली आहे. बाहेर येणारे नागरिक हे अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत का नाही हे ओळखणेही कठीण आहे. 

सरकारकडून सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर दुकाने बंद आहेत. मात्र नागरिक नोकरी आणि काही कामांसाठी बाहेर पडले आहेत असं त्यांनी गाड्यांवर लावलेल्या स्टिकर्स आणि बोर्ड वरुन दिसत होतं. 

चौकांमध्ये बॅरिकेड्स पण पोलीस नाही........
शहरातील काही चौक आणि रस्त्यांवर बॅरिकेड लावण्यात आले आहेत. पण त्याठिकाणी पोलीस नसल्याचे चित्र दिसून आले आहे. काही ठिकणी पोलीस असूनही नागरिकांना अजिबात थांबवले जात नाहीये. 

बॅंकांबाहेर गर्दी 
दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज बॅंकाबाहेर गर्दी पहायला मिळाली. मोठ्या प्रमाणावर लोक आत बॅंकेतली आज कामे करुन बाहेर पडलेले दिसले. अनेक बॅंकाबाहेर रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र