शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित भारनियमनामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST

अनियमित वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. वेल्हे तालुक्यात उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. ...

अनियमित वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. वेल्हे तालुक्यात उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. तालुक्यात कोठेही एमआयडीसी किंवा एखादी मोठी कंपनी नसल्याने

तालुक्यातील तरुणांना रोजगारांचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे येथील तरुण शेतीकडे वळाला आहे. आधुनिक पद्धतीने व सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. परंतु वेल्ह्यात महावितरणकडून आठवडाभराचे लोडशेडिंग सुरु आहे. एक आठवडा दिवसभर वीज तर एक आठवडा रात्रभर वीज असते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे शेतीचे वेळापत्रक कोलमडले आहे. तर कोरोनामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतात गहू, ऊस, भेंडी, काकडी, मेथी, कोथिंबीर, मुळा, पालेभाज्या, टॅामेटो आदी पिके घेतली आहेत.

शेतीला वेळेवर पाणी मिळाले तरच पिके चांगली येणार आहेत. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता सर्पदंश झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तरी शेतीसाठी चोवीस तास वीज द्या, अशी मागणी शेतकरी संतोष लिम्हण, शिवराज शेंडकर,व गणेश जागडे यांनी केली आहे.