शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

फटाके गोडाऊन मालकावर गुन्हा

By admin | Updated: June 5, 2016 03:37 IST

दौंडच्या फटाक्यांचे गोडाऊन मालक राजेंद्र पोखरणा (रा. अहिल्यादेवी होळकर सहकार चौक, दौंड) यांच्यावर स्फोटक पदार्थ बाळगण्यात हयगय करून तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा

दौंड : दौंडच्या फटाक्यांचे गोडाऊन मालक राजेंद्र पोखरणा (रा. अहिल्यादेवी होळकर सहकार चौक, दौंड) यांच्यावर स्फोटक पदार्थ बाळगण्यात हयगय करून तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणेअंमलदार दिलीप भाकरे यांनी दिली आहे. गुरुवारी (दि. २) सायंकाळी फटाक्याच्या गोडाऊनला अचानक आग लागली होती. या आगीत मोठे नुकसान झाले; मात्र जीवितहानी झाली नाही. या संदर्भात दौंडचे पोलीस अण्णासाहेब देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात फटाके ठेवून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. स्फोटक पदार्थांमुळे मानवी जीवन धोक्यात येईल व मालमत्तेचे नुकसान होईल, हे माहीत असतानादेखील गोडाऊन मालकाने कुठलीही दखल घेतली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. (वार्ताहर)विद्युततारांच्या घर्षणामुळे आग या संदर्भात निकेत पोखरणा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की घटनास्थळी दोन नारळाची झाडे आहेत. या नारळांच्या मधून विद्युत महावितरण कंपनीची लाईन गेलेली आहे. हवेमुळे विद्युततारा घासल्या आणि उडालेल्या ठिणग्यांमुळे झाडावर असलेल्या सुक्या नारळांना आग लागली. यातील एक पेटलेला नारळ खाली पडला आणि त्यातून आग लागली.