धमकावून शारिरीक संबंध ठेवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

By Admin | Updated: July 2, 2017 02:15 IST2017-07-02T02:15:54+5:302017-07-02T02:15:54+5:30

महाविद्यालयीन युवतीशी मनाविरुद्ध शारिरीक संबंध ठेवून, तिचा गर्भपात केल्याच्या आरोपावरुन एक जणांविरुध्द, दलित अत्याचार कायदा, धमकावून

Crime against one in the case of physical harassment | धमकावून शारिरीक संबंध ठेवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

धमकावून शारिरीक संबंध ठेवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

 लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : महाविद्यालयीन युवतीशी मनाविरुद्ध शारिरीक संबंध ठेवून, तिचा गर्भपात केल्याच्या आरोपावरुन एक जणांविरुध्द, दलित अत्याचार कायदा, धमकावून शारीरिक संबंध ठेवल्याचा गुन्हा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश बाबा जाधव (रा. पिंपरी खुर्द, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. सदर महाविद्यालयीन युवतीनेच त्याच्याविरूध्द तक्रार दिली आहे. तिची व आरोपीची ओळख व मैत्री झाली. त्यानंतर काही दिवसातच त्याने तिच्या मनाविरुध्द तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सप्टेंबर २०१६ मध्ये ती गर्भवती राहिली. याची कल्पना तिने आरोपीस दिली. त्यानंतर त्याने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले. तिचा विरोध असताना तिला तो पुण्याला घेवून गेला. तिचा गर्भपात केला. पुण्याला जाताना फिर्यादीने मैत्रिणीचा अपघात झाल्याची सबब तिच्या घरच्यांना सांगितली होती.

Web Title: Crime against one in the case of physical harassment