शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट डिग्री तयार करणारे रॅकेट

By admin | Updated: May 30, 2014 04:32 IST

पुणे विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे बनावट पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टिफिकेट) सिंगापूर शासनाकडून विद्यापीठाला प्राप्त झाले आहे.

पुणे : पुणे विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे बनावट पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टिफिकेट) सिंगापूर शासनाकडून विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. विद्यापीठाने याबाबत स्थापन केलेल्या समितीच्या अहवालातून बनावट प्रमाणपत्र सादर करून परदेशात नोकरी मिळविली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेकडो बनावट पदवी प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट अस्तित्वात असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विद्यापीठातर्फे याबाबतचा तपास पोलिसांकडे दिला जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. पुणे विद्यापीठातर्फे पदवी प्रमाणपत्रे खासगी कंपनीकडून तयार करून घेतली जातात. त्यात विद्यापीठाच्या काही माजी कुलगुरूंच्या सह्यांचे स्कॅनिंग करून बनावट पदवी प्रमाणपत्र तयार करण्यात आली आहेत. एवढेच नाही, तर ही प्रमाणपत्रे परदेशात नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी सादर करण्यात आली आहेत. विद्यापीठाचे वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने यासंदर्भातील अहवाल विद्यापीठाकडे सादर केला. नुकत्याच झालेल्या परीक्षा मंडळाच्या (बीओई) बैठकीत या अहवालावर विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करून घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सिंगापूर येथे नोकरी करत असलेल्या कर्मचार्‍यांच्या पदवी प्रमाणपत्रांच्या पडताळणीत सर्व १८७ प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यात उत्तर प्रदेश व हरियाणा येथील रहिवासी असल्याचे आढळून येत आहे. तसेच इराणी उमेदवारांनीसुद्धा विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकर्‍या मिळविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बनावट पदवी प्रमाणपत्र तयार करण्यात विद्यापीठातील कर्मचार्‍यांचा हात आहे का, याचा तपास करावा लागणार आहे. तसेच विद्यापीठाच्या बाहेरील व्यक्ती बनावट पदवी प्रमाणपत्र तयार करण्याचे रॅकेट चालवत आहेत का, हेसुद्धा पडताळून पाहावे लागणार आहे. त्यासाठी हा तपास सीबीआयने करावा, अशी मागणीही विद्यापीठातर्फे केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)