शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : ससून रुग्णालयाचा कोरोना प्रोटोकॉल राज्य सरकारला सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 21:33 IST

काेराेनाशी कशाप्रकारे लढा द्यावा याबाबतचा प्राेटाेकाॅल ससून रुग्णालयाने तयार केला असून ताे मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

राजानंद मोरेपुणे : कोरोना बाधित रुग्णांवरील उपचार, डॉक्टर व परिचारिकांना घ्यायची दक्षता, विलगीकरण, औषधांचे डोस, विविध उपाययोजना आदी बाबींचा अभ्यास करून ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोना प्रोटोकॉल तयार करून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. ससून रुग्णालयातील तज्ज्ञांनी तयार केलेले स्वाईन फ्लुचे प्रोटोकॉल जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केले होते. त्यामुळे कोरोनाच्या प्रोटोकॉललाही मान्यता मिळाल्यास त्यानुसार पुढील उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.

देशात २००९ मध्ये स्वाईन फ्लुने डोके वर काढले. देशातील पहिल्या मृत्यूची नोंद पुण्यात झाली. त्यानंतर संपुर्ण देशातच स्वाईन फ्लुच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत गेली. देशातील सर्वाधिक मृत्यूची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. या आजाराचा सामना करताना कोणती दक्षता घ्यावी, उपचार कसे असावेत, रुग्णांचे विविध गट, त्यांचे विलगीकरण, त्यानुसार औषधोपचार, अतिदक्षता कक्षातील सुविधा, रुग्णावर उपचार करताना घेण्याची काळजी, चाचणी आदी मुद्यांबाबत ससून रुग्णालयातील विविध विभागातील तज्ज्ञांनी प्रोटोकॉल तयार केला होता. हा प्रोटोकॉल जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केला होता. त्याआधारे पुढे राज्य शासनानेही स्वाईन फ्लुच्या उपचारांसंदर्भात अंतिम प्रोटोकॉल तयार केला.

कोरोना विषाणुचा देशातील वाढता प्रभाव लक्षात घेऊन स्वाईन फ्लुच्या धर्तीवर कोरोनासाठीही प्रोटोकॉल तयार करण्याचे काम ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी हाती घेतले होते. यामध्ये प्रामुख्याने उपचार पध्दत, रुग्णांच्यी प्रकृतीनुसार औषधोपचार, विलगीकरण कक्षात जाताना वैद्यकीय कर्मचाºयांनी घ्यावयाची दक्षता, कोणत्या रुग्णांची चाचणी घ्यावी, त्याचे अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजना, अतिदक्षता कक्षातील सुविधा आदीचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर अंतिम संस्कार कसे करावेत, यासंदर्भातही प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे. नुकताच हा प्रोटोकॉल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाने त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे जाईल. त्यानंतर त्यावर अंतिम मोहोर उमटेल.

स्वाईन फ्लुप्रमाणे कोरोनासाठीही तांत्रिक समितीने प्रोटोकॉल तयार केला आहे. राज्य शासनाला हा प्रोटोकॉल सादर करण्यात आला आहे. कोरोनावरील उपचारपध्दतींसाठी आवश्यक उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश आहे.  - डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटल