शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Pune : पुणे जिल्ह्यात गुरूवारी ९ हजार ८४१ नवे रुग्ण;९,१८६ जणांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 22:34 IST

पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट .....

पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी ९ हजार ८४१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ९ हजार १८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पुणे शहरात गुरुवारी ४ हजार ५३९ तर पिंपरीत २ हजार ५३९ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तसेच पुणे शहरात ४ हजार ८५१ तर पिंपरीत २ हजार १५६ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे जिल्ह्याची सक्रिय कोरोना १ लाख १ हजार ९१६ झाली असून त्यात ७३ हजार ८०२ हॉस्पिटलमध्ये तर २८ हजार ११४ गृह विलगिकरणात आहे. 

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ हजार ८८२ झाली आहे. तर शहरात संख्या ६  हजार ४९९ झाली आहे.

 

 

पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६ लाख ४९ हजार ५६५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ७ लाख ६३ हजार १९४ झाली आहे.

.......

पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

पुणे : शहरात गेल्या चार दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात २२ हजार २७७ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २०.३७ टक्के इतकी आहे.

दरम्यान आज दिवसभरात सर्वाधिक म्हणजे ८० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २४ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १़६३ टक्के इतका आहे.कोरोनाबातिधांची वाढती संख्येनुसार शहरातील मृत्यूदर कमी होत असला तरी, गेल्या दहा दिवसात शहरातील कोरोनाबाधितांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार २११ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३१३ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत १९ लाख ६८ हजार ५१४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ८७ हजार ३० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख २९  हजार १४८ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५१ हजार ५५ इतकी झाली आहे.

---------------------------------

रूग्णसंख्या कमी होऊनही बेड मिळेना....

शहरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या वाढीच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.अशावेळी शहरातील विविध रूग्णालयांमधील खाटा रिक्त होणे अपेक्षित होते. मात्र तसे अद्यापही झालेले नाही.  सद्यस्थितीला सौम्य लक्षणे असलेले व होम आयसोलेशेनमध्ये (गृह विलगीकरणात) असलेले कोरोनाबाधित १७ दिवसानंतर कोरोनामुक्त झाल्याचे महापालिकेकडून शहानिशा केल्यानंतर जाहिर करण्यात येत आहेत. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूने आपले स्वरूप बदलले आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार अनेकांना या आजारातून मुक्त होण्यासाठी जास्तीचा अवधी लागत आहे. त्यातच नव्या विषाणूचा मारा हा फुफुसावर अधिक प्रमाणात होत असून, यामुळे अनेकांना श्वसन विकार होत असल्याने त्यांना आॅक्सिजनची गरज बराच काळ लागत आहेत. तसेच अन्य व्याधी असलेल्या कोरोनाबाधितांना अशा परिस्थितीत रूग्णालयांत दाखल करून घ्यावेच लागते. यामुळे रूग्णालयांमधील संख्या, शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी कमी होताना दिसत नाही, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वावरे यांनी दिली.

 -----------------------------------------

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तcollectorजिल्हाधिकारी