शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: पुण्यात खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने चौघांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 05:08 IST

चाकणमधील रुग्णालयात तिघांचा मृत्यू : शेवाळवाडीतही एकाने प्राण सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ऑक्सिजन संपल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चाकणमधील खासगी रुग्णालयात तीन जणांचा, तर पुण्यातील शेवाळवाडीतील एकाचा मृत्यू झाला.चाकणमधील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी पहाटे ऑक्सिजन संपल्याने २० गंभीर रुग्णांना तातडीने अन्यत्र हलवण्यात आले. मात्र, ३ रुग्णांना प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेल्यांत २५ वर्षीय युवकासह ४५ वर्षीय पुरुष आणि ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने मध्यरात्री रुग्णालय प्रशासनाने संबंधित २० रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन आणि व्हेन्टीलेटरवर असलेल्या रुग्णांना हलवण्याच्या सूचना केल्या. काही रुग्णांना नातेवाइकांनी हलवले. मात्र अन्य रुग्णांच्या नातेवाइकांना कुठेही व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही. त्यामुळे नातेवाईक देखील हतबल झाले. अखेर यातील तीन रुग्णांनी ऑक्सिजनअभावी प्राण सोडले.आणखी काही मृत्यू झाले आहेत का, याबाबतची पडताळणी सुरू असल्याचे चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले. मृत्यू झालेल्यांपैकी ३ मृतदेहांवर चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरातील गॅसदाहिनीत मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

हडपसरमध्येही एक रुग्ण दगावलाहडपसरजवळील शेवाळेवाडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच ऑक्सिजन संपल्याने एकाचा मृत्यू झाला. रुग्णालयात ५३ बेड असून, ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील ऑक्सिजनही संपत आला होता. आरोग्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर सात सिलिंडर मिळाले. डॉ. अभिजित दरक म्हणाले, हॉस्पिटलमध्ये २३ ऑक्सिजन बेड आहेत, १२ व्हेंटिलेटर बेड असून, कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांना एका तासाला सात ऑक्सिजन सिलिंडर गरज आहे. आता फक्त एक-दीड तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस