coronavirus: पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 10:08 AM2021-02-21T10:08:56+5:302021-02-21T10:09:42+5:30

Ajit Pawar's big decision to stop the spread of covid-19 : पुणे शहर, जिल्हा आणि आसपासच्या भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत.

coronavirus: Containment Zone will be created in Pune again, Ajit Pawar's decision to stop the spread of corona | coronavirus: पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय

coronavirus: पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय

Next

पुणे - शहर, जिल्हा आणि आसपासच्या भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. (Coronavirus in Pune) त्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ज्या भागात रुग्ण अधिक वाढत आहेत, अशा 'हॉटस्पॉट' प्रभावी नियोजन करून आवश्यकता भासल्यास पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रे (Containment Zone) निर्माण करावेत अशा सूचना पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या. (Containment Zone will be created in Pune again)

पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे कोरोना नियंत्रण आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पशुसंवर्धन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, एड. वंदना चव्हाण, आमदार डॉ. सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे पालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त राजेश पाटील, आणि लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी अधिकाऱ्यांनी कोरोनाची सद्यःस्थिती, उपाययोजना याची माहिती दिली.

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघर भेटी देऊन सुपर स्प्रेडर, आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या ताप सदृश्य रुग्णांची स्वाब तपासणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपर्क शोध मोहीम (Contact Tracing) अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना पवार यांनी केल्या. यासोबतच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पवार यांनी बैठकीमध्ये केले.

Web Title: coronavirus: Containment Zone will be created in Pune again, Ajit Pawar's decision to stop the spread of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.