शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : बाप रे! कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा अहवाल आला 'पॉझिटिव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 18:35 IST

दोन डॉक्टर आणि एक कर्मचाऱ्यांना लस घेतल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाची लागण

पिंपरी : कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन डॉक्टर आणि एक कर्मचारी आहे.या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू  असून, प्रकृती स्थिर आहे.  या तिघांचाही दुसरा डोस घेणे बाकी आहे. अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यावर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे म्हणाले की, पहिला डोस घेतल्यानंतर साधारण ८ ते १० दिवसानंतर शरीरात एन्टीबॉडीज तयार होतात. तसेच पहिल्या डोस नंतर साधरण ६५ टक्के प्रतिकारक्षमता तयार होते. दुसऱ्या डोस घेतल्यावर १० ते १५ दिवसानंतर शरीरात उर्वरित एन्टीबॉडीज तयार होतात. दोन्ही डोस घेतल्यावर साधारण ७० ते ९० टक्के प्रतिकारक्षमता तयार होते.

आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन कर्मचारी यांना लस देण्याचा कार्यक्रम सध्या शहरात सुरू आहे. मागील काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन महापालिेने केले आहे. शहरात आतापर्यंत २०६४६ जणांनी घेतली लस घेतली आहे.

कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे दुसरा डोस घेतला नाही...कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी एकाने पाच फेब्रुवारीला, दुसऱ्याने 25 जानेवारी तर तिसऱ्याने 16 जानेवारी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. 16 जानेवरील ज्याने लस घेतली त्याला दुसरा डोस 14 फेब्रुवारीला मिळणे अपेक्षित होते. परंतु त्यावर महापालिका उत्तर देत नाही. कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे त्यांनी दुसरा डोस घेतला नाही असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर