शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : पुणे शहरात शुक्रवारी २९८ व पिंपरीत १२२ जण नवे कोरोना पॉझिटिव्ह   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 21:35 IST

पुणे शहरात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७९०

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शुक्रवारी दिवसभरात २९८ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ६१ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७९ जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. यातील २३१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८२७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५ मृतांची नोंद करण्यात आली आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५६४ झाली आहे. 
 दिवसभरात एकूण २७६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७९० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७५  हजार ४१५ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ६१ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ६५८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ७९ हजार २०६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

.......  
पिंपरीत १२२ जण कोरोना पॉझिटिव्ह   
पिंपरी  : औद्योगिकनगरीत कोरानाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असून शहरातील सात आणि शहराबाहेरील तीन अशा दहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसभरात १२२ जण पॉझिटिव्ह आढळले असून ९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर २ हजार  ४८३ जणांना डिस्चार्ज दिला आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात नाव्हेंबरच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णसंख्या अडीचशेच्या आत आली होती. ही आता दीडशेच्या आत आली आहे. मात्र, कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात २ हजार ५१० जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी २ हजार ०७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ६७४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.  तर दाखल रुग्णांची संख्या ७१९ वर पोहोचली आहे.

कोरोनामुक्तीचा आलेख वाढत असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजार ७०७ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  ९५ हजार ०७० वर पोहोचली आहे. दोन दिवसात कोरोनामुक्तांची संख्या कमी होत असताना दिसत आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकर