Corona Vaccination Politics: राज्यात लसींचा साठा आहे! केंद्र अन् ठाकरे सरकारमध्ये लसीकरणावरून पेटलेल्या राजकारणात नवा 'ट्विस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 06:19 PM2021-04-09T18:19:38+5:302021-04-09T18:27:06+5:30

राज्याकडे कोविशील्ड चा तुटवडा असला तरी प्रत्यक्षात कोव्हॅक्सिन उपलब्ध असल्याचे आता स्पष्ट झालं आहे.

Corona Vaccination Politics : The state has stocks of vaccines! A new twist in the politics ignited by vaccination in the Central and State Governments | Corona Vaccination Politics: राज्यात लसींचा साठा आहे! केंद्र अन् ठाकरे सरकारमध्ये लसीकरणावरून पेटलेल्या राजकारणात नवा 'ट्विस्ट'

Corona Vaccination Politics: राज्यात लसींचा साठा आहे! केंद्र अन् ठाकरे सरकारमध्ये लसीकरणावरून पेटलेल्या राजकारणात नवा 'ट्विस्ट'

Next

प्राची कुलकर्णी - 

पुणे : लसीकरणावरुन सुरु असलेल्या राजकारणात आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. केंद्र सरकार लस देत नसल्याने राज्यात तुटवडा झाल्याचा आरोप राज्य सरकार करत आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारकडे कोव्हॅक्सीनचे डोस असल्याचे स्पष्ट झाले आहे. या लसी न संपवता नवा स्टॅाक का मागवताय असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान, मध्यंतरी कोव्हॅक्सिन दिलेले असल्याने त्यांचे पुढच्या टप्प्यातील लसीकरण करण्यासाठी या लसी शिल्लक ठेवण्यात आल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. 

पुणे जिल्ह्यात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण थांबवण्याची वेळ आली. राज्यातही अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाल्याने सांगण्यात येत आहे. आता या प्रश्नात आणखीनच नवी माहिती समोर आली आहे.

राज्याकडे कोव्हिडशिल्डचा तुटवडा असला तरी प्रत्यक्षात कोव्हॅक्सिन उपलब्ध असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. मात्र राज्य सरकारने या लसी दुसऱ्या डोस साठी राखीव ठेवायचा आदेश दिलेला आहे. 

उपलब्ध आकडेवारी नुसार राज्यांत आत्ताही कोव्हॅक्सिनच्या काही लाख लसी उपलब्ध आहेत. मात्र ५ तारखेला काढलेल्या आदेशानुसार या संपुर्ण लसी दुसऱ्या डोस साठी राखीव ठेवण्यास सांगण्यास आले आहे. या लसी शिल्लक असल्याने केंद्र सरकार नव्या लसी कशासाठी द्यायचा असा सवाल उपस्थित केला आहे.

सरकारच्या आदेशानुसार लसीचा तुटवडा जाणवणाऱ्या पुण्यातच यापैकी ६७००० लसी शिल्लक आहेत. अडचणीच्या काळात या लसी वापरायच्या का असा सवाल अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.मात्र याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश दिला नाहीये. पण या सगळ्यामुळे हा लसीचा तुटवडा कृत्रिम की खरा असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Corona Vaccination Politics : The state has stocks of vaccines! A new twist in the politics ignited by vaccination in the Central and State Governments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.