शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कोरोना तपासणी महापालिकेकडून तयारी पूर्ण -यंत्रणा उभारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर व राज्य शासनाच्या निर्देषानुसार, पुणे महापालिकेने अन्य राज्यातून रेल्वे आणि विमानाने येणाºया ...

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर व राज्य शासनाच्या निर्देषानुसार, पुणे महापालिकेने अन्य राज्यातून रेल्वे आणि विमानाने येणाºया प्रवाशांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारली असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

राज्य शासनाने कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्व यंत्रणांनी खबरदारी घेण्याची सूचना नुकतीच दिली होती़ त्यातच पुण्यातही मागील काही दिवसांत आॅक्टोबरच्या तुलनेत सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे़ त्यामुळे परराज्यातून विशेषत: दिल्लीहून येणाºया सर्व प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे़ यानुसार रेल्वे स्थानकावर लक्षणे असलेल्या रूग्णांची अ‍ॅण्टीजेन तपासणी करण्यात येणार आहे़ तर विमानतळावर सर्वच प्रवाशांची आरटीपीसीआर (स्वॅब) तपासणी होणार आहे़

परराज्यातून येणाºया प्रवाशांच्या तपासणीसंदर्भात माहिती देताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, की एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आणि रेल्वे प्रशासनातील अधिकाºयांसोबत आज बैठक झाली. या बैठकीमध्ये अन्य राज्यांतून विमानतळावर आणि शहरातील रेल्वे स्थानकांवर येणाºया प्रवाशांची तपासणी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पुर्वीचा अनुभव लक्षात घेता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही पावले उचलली गेली आहेत़ प्रवाशांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा उभी करण्यात येत आहे़ प्रवासी संख्या आणि रेल्वे स्थानकांची संख्या पाहता याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत़

खाजगी बसेस तसेच राज्य परिवहन विभागांच्या बसने येणाºया प्रवाशांच्या तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियोजन करण्यात येत आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एस.टी. स्थानकासोबतच अन्य राज्यातून येणाºया अथवा जाणाºया खाजगी बसेसच्या थांब्यांवरही तपासणीसाठी यंत्रणा निर्माण करण्याची तयारी सुरू करण्याबाबत बैठकांमध्ये चर्चा झाल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले़

------------------