जीएसटीच्या दरात सवलतीने ग्राहकांनी साधला दसऱ्याला खरेदीचा मुहूर्त; इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठा गजबजल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:15 IST2025-10-03T11:15:23+5:302025-10-03T11:15:23+5:30

घरगुती उपकरणांसह, डिश वॉशर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल फोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तू खरेदी करण्याला नागरिकांनी प्राधान्य दिले

Consumers made Dussehra a great time to shop due to the discount in GST rates; Electronics markets were bustling | जीएसटीच्या दरात सवलतीने ग्राहकांनी साधला दसऱ्याला खरेदीचा मुहूर्त; इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठा गजबजल्या

जीएसटीच्या दरात सवलतीने ग्राहकांनी साधला दसऱ्याला खरेदीचा मुहूर्त; इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठा गजबजल्या

पुणे: यंदाच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी होत आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्या आहेत. दसरा सणाच्या मुहूर्तावर नवीन वस्तूंची खरेदी करण्याची प्रथा असल्याने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. घरगुती उपकरणांसह, डिश वॉशर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल फोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तू खरेदी करण्याला नागरिकांनी प्राधान्य दिले.

घरात एखादी नवी वस्तू खरेदीचे नियोजन कुटुंबांकडून आधीच केले जाते. मात्र प्रत्यक्ष खरेदीसाठी एखादा चांगला दिवस बघून नवीन वस्तू घरी आणण्याची प्रथा आहे. त्यामुळे नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी दसऱ्याचा मुहूर्त साधला असल्याचे बाजारात दिसत आहे. बाजारपेठेत सकाळपासूनच नागरिकांची पावले खरेदीसाठी वळू लागली होती. लक्ष्मी रस्त्यासह, टिळक रस्ता, कुमठेकर परिसरात सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ सुरू होती. दुपारनंतर ही गर्दी आणखी वाढली. विविध दुकानदारांनी दसऱ्यानिमित्त खास सवलतींची योजना आणल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी ‘बाय वन गेट वन’, ‘नो कॉस्ट ईएमआय’, ‘कॅशबॅक’ अशा आकर्षक ऑफर दिल्या जात होत्या.काही दुकानदारांच्या मते, मागील काही महिन्यांच्या तुलनेत दसऱ्यापासून खरेदीला सुरुवात झाली आहे. सध्या सणासुदीमुळे बाजाराला चांगला उभारी मिळाली आहे. सणासुदीचा उत्साह, डिजिटल उपकरणांवरील वाढती अवलंबित्व आणि सवलतींचे आकर्षण यामुळे यंदा दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत खरेदीचा जोर अधिकच वाढलेला दिसून आला. यातच इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर कमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जीएसटीचे दर अधिक असल्यामुळे बहुतांश ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी हात आखडता घ्यावा लागत होता. मात्र, यंदा नागरिकांना मनाजोगी वस्तू खरेदी करता येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीमध्येहीदेखील नागरिकांचा हा उत्साह कायम राहणार आहे.

वाढत्या मागणीमुळे अनेक मालाचा तुटवडा

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर कमी झाल्यामुळे यंदा दसऱ्याच्या निमित्ताने ग्राहकांचा कल घरगुती उपकरणांकडे वाढलेला आहे. विशेषतः डिश वॉशर आणि वॉशिंग मशीन यांना मोठी मागणी आहे. त्याचबरोबर ५५ इंचांपेक्षा मोठ्या आकाराच्या टीव्हींनाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे.- प्रीतम भालघट, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक

Web Title : जीएसटी कटौती से दशहरा खरीदारी में उछाल; इलेक्ट्रॉनिक्स बाजार गुलजार।

Web Summary : जीएसटी में कमी से इस दशहरे पर इलेक्ट्रॉनिक्स की बिक्री बढ़ी। पुणे के बाजार टीवी, वाशिंग मशीन और डिशवॉशर खरीदने वालों से गुलजार रहे। आकर्षक ऑफर और त्योहार की भावना ने तेजी को बढ़ावा दिया।

Web Title : GST cut fuels Dussehra shopping spree; electronics markets thrive.

Web Summary : Reduced GST boosted electronics sales this Dussehra. Pune markets buzzed with shoppers buying TVs, washing machines, and dishwashers. Attractive offers and festive spirit drove the surge.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.