काँग्रेस देणार मुद्देसूद पण आक्रमकपणे उत्तर; पुणे शहर काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 13:01 IST2017-12-12T12:06:15+5:302017-12-12T13:01:29+5:30
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया सेलचे व अधिकृत फेसबुक पेजचे उद्घाटन ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

काँग्रेस देणार मुद्देसूद पण आक्रमकपणे उत्तर; पुणे शहर काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे उद्घाटन
ठळक मुद्दे उल्हास पवार यांच्या हस्ते झाले शहर काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे उद्घाटनचारित्र्यहनन आणि बदनामीला देणार मुद्देसुद पण आक्रमकपणे उत्तर
पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया सेलचे व अधिकृत फेसबुक पेजचे उद्घाटन ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, सुरेश धर्मावत, सेल अध्यक्ष चैतन्य पुरंदरे उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस नेतृत्वाचे चारित्र्यहनन आणि बदनामीची मोहिम सोशल मीडियात चालवली जात असून या मोहिमेला काँग्रेस मुद्देसुद पण आक्रमकपणे उत्तर देईल असे चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले.