काँग्रेसचे अध्यक्षपद आणि नेहरू-गांधी कुटुंब, राहुल सहावे अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 06:10 PM2017-12-11T18:10:53+5:302017-12-11T18:18:31+5:30

नेहरु-गांधी कुटुंबातून सर्वात अगोदर मोतीलाल नेहरु 1919 साली पक्षाचे अध्यक्ष बनले. मोतीलाल नेहरू हे १९१९, १९२८ असे दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात. मोतीलाल नेहरु यांच्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याकडे 1929 साली ही धुरा देण्यात आली.

गांधी-नेहरु यांची तिसऱ्या पिढीत 1959 साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर 1974 ते 1984 या काळात त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

चौथ्या पिढीत राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं. 1985–91 या कालावधीत त्यांनी अध्यक्षपद भूषवलं

सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी-नेहरु कुटुंबातील सहावे अध्यक्ष आहेत. 16 डिसेंबरला सकाळी 11 वाजता राहुल अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेणार आहेत. 132 वर्ष जुन्या असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधींची बिनविरोध निवड झाली.