शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा तास चालली गर्भवतीची गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ३३ वर्षीय गर्भवती महिलेची हृदयाच्या महाधमनीतील झडपेची अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ ‘फ्रोजन एलिफंट ट्रंक’ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ३३ वर्षीय गर्भवती महिलेची हृदयाच्या महाधमनीतील झडपेची अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ ‘फ्रोजन एलिफंट ट्रंक’ शस्त्रक्रिया दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडली. ओपन हार्ट सर्जरी, प्रसूती, शस्त्रक्रियेनंतर कोरोनाची लागण अशा दिव्यातून महिलेसह बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. पश्चिम भारतातील अशी शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली. यापूर्वी चेन्नई आणि दिल्ली येथे शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. धैर्यशील कणसे यांनी शस्त्रक्रियेबाबत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “संबंधित महिलेच्या हृदयाच्या दुर्मिळ विकाराचे निदान झाले होते. दहा वर्षांपूर्वी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या महाधमनीजवळील झडपेची शस्त्रकिया झाली होती. गर्भधारणेच्या ३० व्या आठवड्यात २डी एको चाचणीत झडप फाटल्याची शंका आली. रक्तवाहिनीला फुगवटा आल्याने जोखीम वाढली होती. रक्त छातीत साठण्याची भीती निर्माण झाली. रक्तप्रवाह असंतुलित झाल्यास हृदयविकाराचा झटका, तसेच यकृत, मूत्रपिंडालाही धोका निर्माण होऊ शकत होता. अशा परिस्थितीत अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली.”

या परिस्थितीत फ्रोजन एलिफंट ट्रंकसह टोटल एओर्टिक आर्च रिप्लेसमेंट नावाच्या ऑपरेशनची आवश्यकता असते. महाधमनीच्या झडपांचा भाग बदलणे आवश्यक होते. याला एओर्टिक रूट रिप्लेसमेंट किंवा बेंटाल शस्त्रक्रिया म्हटले जाते. यानंतर थॉरफ्लेक्स हायब्रीड प्रोस्थेसीस आणि स्टेंट हा कृत्रिम भाग बसवण्यात आला. महाधमनीतील काप अत्यंत लांब होता आणि तो एका कृत्रिम अवयवाने पूर्णपणे झाकला जाऊ शकत नव्हता.

महाधमनीचा उर्वरित फाटलेला भाग वगळण्यासाठी कॅथलॅबमध्ये हायब्रीड प्रोस्थेसीस ओव्हरलॅप करणारा अतिरिक्त महाधमनी स्टेंट बसवला गेला. शस्त्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १५ तास लागले. रुग्णास आयसीयूमध्ये हलविण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यावर आईसह बाळाला घरी सुखरूप सोडण्यात आले. डॉ. अस्मिता पोतदार, डॉ. धैर्यशील कणसे, डॉ. अद्वैत कोथुरकर आणि डॉ. शार्दूल दाते, डॉ. नीलेश जुवेकर, डॉ. शर्मिला देशपांडे, डॉ. प्रशांत मिश्रा, डॉ भारत पुरंदरे या सर्व वैद्यकतज्ज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.