शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आधी रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करा; नंतरच टोलवसुली ; खेड शिवापूर टोलनाक्यावर शिवसेनेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 12:51 IST

 गेले अनेक वर्षे पुणे-सातारा रोडवरील कात्रज बोगदा ते सारोळापर्यंतच्या रस्त्याची अवस्था एकदम दयनीय आहे.

ठळक मुद्देरिलायन्स इन्फ्राला दिले निवेदन .. तर १ जानेवारीपासून या ठिकाणी टोलवसुली करू देणार नाही

खेड शिवापूर/वेळू : पुणे-सातारा रस्त्याची रखडलेली कामे, पुलांची दुरवस्था तसेच वाढलेला टोल या विरोधात भोर व हवेली तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने मंगळवारी पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात आले.  गेले अनेक वर्षे पुणे-सातारा रोडवरील कात्रज बोगदा ते सारोळापर्यंतच्या रस्त्याची अवस्था एकदम दयनीय आहे. अनेक ठिकाणी पुलांची चाललेली संथ कामे, सेवा रस्त्याची दुरवस्था त्यामुळे या भागात प्रवास करणे एकदम जिकिरीचे झाले आहे. असे असतानाही टोलवसुली मात्र जोरात चालू आहे. याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी सांगितले.     कोंडे  म्हणाले, की या रस्त्याची कामे वेगात व्हावी यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिली. आंदोलन केली. येत्या महिन्याभरात जर सेवा रस्ते व अपूर्ण पुलांची कामे चालू झाली नाही तर १ जानेवारीपासून या ठिकाणी टोलवसुली करू देणार नाही. आज हे आंदोलन लोकशाही पद्धतीने करतोय. भविष्यात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तसेच दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल. याला सर्वस्वी जबाबदार टोल आणि रोड प्रशासन असेल.  प्रशासन तसेच महामर्गाचा विकास करणारी कंपनी रिलायन्स इन्फ्राचे व्यस्थापक बी. के. सिंग यांनी या वेळी येत्या महिन्याभरात अपूर्ण सेवा रस्ते व पुलांची कामे कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून देण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, भोर तालुका उपसभापती अमोल पांगारे, महामार्ग प्राधिकरणाचे  सुहास चिटणीस, भोर तालुकाप्रमुख माऊली शिंदे, आदित्य बोरगे, युवा नेते लाला रेणुसे, रोहिदास कोंडे, अशोक वाडकर तसेच नागरिक उपस्थित होते.  शिवसेनेतर्फे रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अपूर्ण कामांमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघाताची जबाबदारी रोड प्रशासनाने स्वीकारून अपघातग्रस्तांना आर्थिक मदत करावी. सद्यस्थितीत कात्रज बोगदा ते सारोळा दरम्यानच्या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तर मुख्य रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. स्थानिक नागरिकांची या टोलनाक्याच्या जाचातून सुटका नाही. दररोज या टोलनाक्यावर होणारी स्थानिकांची लूट आता थांबलीच पाहिजे, या उद्देशाने सामान्य नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Puneपुणेtollplazaटोलनाकाroad safetyरस्ते सुरक्षाShiv Senaशिवसेना