पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 00:53 IST2026-04-29T00:52:15+5:302026-04-29T00:53:21+5:30
पुण्यात चंदन नगर पोलीस ठाण्यातील २ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. त्यांनी घराचा दरवाजा तोडून या व्यक्तीला वाचवले. पोलीस ...

पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला
पुण्यात चंदन नगर पोलीस ठाण्यातील २ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. त्यांनी घराचा दरवाजा तोडून या व्यक्तीला वाचवले. पोलीस कॉन्स्टेबल अनिल तलवारे आणि पोलीस कॉन्स्टेबल सतीश कतारी असे या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. २७ एप्रिल रोजी हा सपूर्ण थरार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल तलवारे व पोलिस कॉन्स्टेबल कतारी हे दोघे ही ड्युटीवर असताना, संध्याकाळी ७ वाजता "आपले वडील घरात आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत" असा फोन आला. पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित व्यक्तीच्या घरी धाव घेतली. फोन केलेला व्यक्तिशी बोलल्यावर पोलिसांना समजले की त्यांच्या वडिलांनी घरचा दरवाजा आतून बंद केला आहे आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ जवळील एका वेल्डर शी संपर्क साधला आणि त्याला बोलवून घराचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. आत प्रवेश करताच क्षणी संबंधित व्यक्ती गळफास लावून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरवून बेड वर बसवलं व त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधून त्यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये उपचाराकामी पाठवले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिस ठाण्यात बोलवून त्याची समजूत घातल्यावर त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल चंदन नगर पोलीस ठाण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला