Pune Crime: 'चला पोलीस ठाण्यात, दाखवतो', क्रेडिट कार्ड वसुली एजंटांकडून नागरिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, पुण्यातील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 15:48 IST2026-04-28T15:47:55+5:302026-04-28T15:48:49+5:30

Pune Crime News: संबंधित एजंट भररस्त्यात त्या नागरिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना त्यांच्यासोबत असलेली महिला हात जोडून विनंती करत होती, मात्र तिचीही पर्वा न करता मारहाण सुरूच ठेवली

Come to the police station I will show you citizen beaten up by credit card recovery agents, outrageous incident in Pune | Pune Crime: 'चला पोलीस ठाण्यात, दाखवतो', क्रेडिट कार्ड वसुली एजंटांकडून नागरिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, पुण्यातील संतापजनक घटना

Pune Crime: 'चला पोलीस ठाण्यात, दाखवतो', क्रेडिट कार्ड वसुली एजंटांकडून नागरिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, पुण्यातील संतापजनक घटना

हडपसर: क्रेडिट कार्डच्या थकबाकी वसुलीच्या वादातून एजंटांकडून थेट रस्त्यावर मारण्याची धक्कादायक घटना घडली. अशी मारहाण करण्याचा अधिकार वसुली एजंटला कोणी दिला. असा सवाल आता नागरिक करीत आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पंधरा नंबर चौकात तीन वसुली एजंटांनी एका नागरिकाला अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी ( 27) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हडपसरपोलिस काय कारवाई करणार आहेत याकडे नागरिकांचे लक्ष आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीसुद्धा या घटनेबाबत त्या एजंट लोकांवर कारावियाची मागणी केली आहे. 

संदीप जामदार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जय कासार, विनीत कासार आणि तनिष खुडे या तिघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी क्रेडिट कार्ड कंपनीचे हे तिघे वसुली एजंट थकबाकी वसूल करण्यासाठी जामदार यांना पंधरा नंबर चौकात अडवले. यावेळी वाद निर्माण होऊन त्या रूपांतर थेट मारहाणीत झाले.

संबंधित एजंटांनी जामदार यांना भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी त्यांच्यासोबत असलेली महिला हात जोडून मारहाण करू नका. अशी विनंती करत होती. मात्र एजंटांनी तिचीही पर्वा न करता शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली. दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. काही नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला.  तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या कारवाईमुळे एजंटांना पोलिसांकडून एकप्रकारे मोकळीक मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटनांत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेदरम्यान एजंटांकडून "चला पोलीस ठाण्यात, दाखवतो" अशा धमक्या दिल्या. याबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याचे हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सांगितले.

खासगी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला आळा घालणे गरजेचे - अमोल कोल्हे 

या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून हडपसरमध्ये ही मारहाण झाली. राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, याबाबत शंका यावी अशी ही घटना आहे. राज्याच्या गृहखात्याने या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर वसुली एजंटांवर कारवाई झाली पाहिजेच पण संबंधित बॅंकेचीही जबाबदारी टाळता येणार नाही. या बॅंकेवरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे. या खासगी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला आळा घालणे गरजेचे आहे.

Web Title : पुणे: क्रेडिट कार्ड वसूली एजेंटों द्वारा व्यक्ति पर हमला; आक्रोश।

Web Summary : पुणे में क्रेडिट कार्ड वसूली एजेंटों ने बकाया राशि को लेकर एक व्यक्ति पर हमला किया। यह घटना हडपसर में हुई, जिससे जनता में आक्रोश है। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और जांच जारी है। हमले का एक वीडियो वायरल हो गया, जिससे एजेंटों के व्यवहार और सख्त नियमों की आवश्यकता पर चिंता जताई जा रही है।

Web Title : Pune: Credit card recovery agents assault man; outrage ensues.

Web Summary : In Pune, credit card recovery agents assaulted a man over unpaid dues. The incident occurred in Hadapsar, sparking public outrage. Police have registered a case, and investigations are underway. A video of the assault went viral, raising concerns about the agents' behavior and the need for stricter regulations.