शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ९१ लाखांचे कोकेन जप्त ; उच्चभ्रू वस्तीत व्हायची विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 20:40 IST

वाढत्या पुण्यात आधुनिकतेचे विविध पर्याय उपलब्ध होत असताना त्यातून होणारे तोटेही जाणवत आहेत. शहराला पडलेला अमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना तब्बल ८७ लाखांचे कोकेन जप्त केले आहे.

पुणे : वाढत्या पुण्यात आधुनिकतेचे विविध पर्याय उपलब्ध होत असताना त्यातून होणारे तोटेही जाणवत आहेत. शहराला पडलेला अमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना तब्बल ८७ लाखांचे कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी शोलाडॉये सॅम्युअल (वय ४४, रावत कप्सरस्टोन सोसायटी, उंड्री) याला अटक केली आहे.    याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात एक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले. या पथकाने सापळा रचून उंड्री परिसरातून आरोपीच्या घरावर छापा मारला. या छाप्यात घराची झडती घेतली असता तिथे ७३३ किलो ग्रॅम कोकेन ज्याची किंमत ८७ लाख ९६ हजार रुपये इतकी आहे. याशिवाय ३ लाख ६८हजार ०७० रुपये रोख रक्कम, १००० रुपयांच्या प्लॅस्टिक पिशव्या, ९० हजार रुपये किंमतीची तीन घड्याळे व २४ हजार किंमतीचे पाच मोबाईल सेट जप्त करण्यात आले. दरम्यान संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने शहरातील एनआयबीएम रस्ता व उंड्री या उच्च्भ्रू वस्तीत पदार्थ विकत असल्याचे सांगितले. दरम्यान त्याला मदत करणाऱ्या साथीदारांचा शोध घेणे सुरु आहे. जॉय हा अतिशय शिताफीने अंमली पदार्थाची तस्करी करत होता़ त्यामुळे मागील २० दिवस पोलीस त्याच्या मागावर होते़ या व्यवसायाच्या आडून तो अंमली पदार्थांची तस्करी करीत होता़ त्याचे कोणी साथीदार आहेत का, त्याने हे कोकेन कोठून आणले तसेच यापूर्वी तो भारतात कधी आला होता का याची चौकशी करण्यात येत असल्याचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले़ यावेळी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख उपस्थित होते.

यावेळी टिकोळे म्हणाले की, ''पोलीस तिथे सध्या वेषात गेले होते. तिथे संबंधित व्यक्ती हातात एक बॅग घेऊन जाताना आढळली. त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र त्याला पकडल्यावर घराची झडती घेतली आणि तो मुद्देमालासकट सापडला''. ही कामगिरी पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे, मोकाशी, राहुल जोशी, महेंद्र पवार, प्रफुल्ल साबळे, मनोज साळुंखे, अमित छदीदार, योगेश मोहिते यांनी केली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिस