एआयसीटीईकडून हवी प्रवेशाबाबत स्पष्टता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:57+5:302021-02-05T05:01:57+5:30

पुणे: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) सीईटी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना ‘एमबीए’ अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, ...

Clarification regarding admission required from AICTE | एआयसीटीईकडून हवी प्रवेशाबाबत स्पष्टता

एआयसीटीईकडून हवी प्रवेशाबाबत स्पष्टता

पुणे: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) सीईटी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना ‘एमबीए’ अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, हा निकष सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना लावला पाहिजे. तसेच एआयसीटीईने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे अद्याप यावर निर्णय घेतला नाही,असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी सांगितले. मात्र, यासंदर्भात तंत्र शिक्षण संचालकांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनावरील लसीकरण सुरू झाले असले तरी अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाविद्यालयात येणाऱ्या व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचा ताळमेळ घालावा लागणार आहे. कोरोना परिस्थिती सुधारणा होत नाही तोपर्यंत ऑनलाइन शिक्षण व ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागणार आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) येत्या ३१ जानेवारीपर्यंत प्रथम वषार्ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. येत्या मार्च, एप्रिल, मे महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परंतु, यासंदर्भात निर्णय घेण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

Web Title: Clarification regarding admission required from AICTE