बीडमधील नागरिकांची भागविली तहान

By Admin | Updated: May 9, 2017 03:47 IST2017-05-09T03:47:34+5:302017-05-09T03:47:34+5:30

मराठवाडा जनविकास संघ संचालित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील कामखेडा

Citizens of Beed shared thirst | बीडमधील नागरिकांची भागविली तहान

बीडमधील नागरिकांची भागविली तहान

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळे गुरव : मराठवाडा जनविकास संघ संचालित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील कामखेडा गावामध्ये मोफत पाणीपुरवठा या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
मराठवाडा जनविकास संघ ही संस्था सामाजिक बांधिलकीतून काम करते. यामध्ये संघाने तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यातील जनावरांना व वन्य प्राण्यांना पाण्याअभावी जिवास मुकावे लागू नये म्हणून सिमेंटच्या ५०० लिटर क्षमतेच्या १०७ टाक्या ठेवून पशुधन वाचवा मोहीम हाती घेतली. या संस्थेने मागील वर्षी भूम, परांडा तालुक्यातील डोंजा, जांब बावी, सोनारी, देऊळगाव, सोनारी या गावांमध्ये सतत मार्च ते जूनपर्यंत पाऊस पडून पाण्याची सोय होईपर्यंत हा उपक्रम चालू होता.
संघाचे अध्यक्ष अरुण पवार व सामाजिक कार्यकर्ते अनीस पठाण यांनी पुढाकार घेतला. हरिभाऊ पाटील, माधव मनोरे, राजेश गाटे, शिवाजी सुतार, दीपक जाधव, उद्योजक व्यंकटेश बिराजदार, शिवाजी कांबळे, सादिक पठाण, उपसरपंच कलंदर पटेल, रतन वाघमारे, शेख अन्सार शेख, शफिक बाबू , शेरअली डॉ नाता, इदरसी समीर, मराठवाडा जनविकास संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Citizens of Beed shared thirst