शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

चौक्यांची सरंजामशाही संपणार

By admin | Updated: January 18, 2015 01:17 IST

पोलीस चौकीस्तरावर तक्रार घेण्यासाठी होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच दखलपात्र गुन्हे दाखल करून घेतले जाणार आहेत.

पुणे : पोलीस चौकीस्तरावर तक्रार घेण्यासाठी होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच दखलपात्र गुन्हे दाखल करून घेतले जाणार आहेत. भोसरी एमआयडीसीतील एका युवतीच्या छेडछाडीच्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे तिला आत्महत्येचा प्रयत्न करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. या निर्णयामुळे पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसमोर तक्रारदार आपली कैफियत मांडू शकणार आहेत. तसेच, पोलीस चौक्यांच्या सरंजामशाहीलाही चाप बसणार आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनीही असाच निर्णय घेतला होता. त्याला काही प्रमाणात विरोधही झाला होता. परंतु, अनेकदा पोलीस चौकीस्तरावर काय सुरू आहे, याची माहितीच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तसेच, पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी तक्रार घेत असल्यामुळे त्यामधील त्रुटींचा फायदा आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होतो. कायद्यानुसार दखलपात्र गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसमोर होणे बंधनकारक आहे. मात्र, चौकीमधील घडामोडींची माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. अनेकदा शहर पोलीस नियंत्रण कक्षाकडून बीट मार्शलला (गस्त) कळवलेली माहिती पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा सूचना दिल्या. मार्चपर्यंत सीसीटीएनएस यंत्रणेद्वारे कामकाज करायला सुरुवात करावी, असे आदेश असल्यामुळे या निमित्ताने पोलीस ठाणे स्तरावर त्याचाही सराव सुरू होईल. ४येत्या २६ जानेवारीला दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. तसेच जर्मनी, अमेरिका आणि पॅरिसमध्ये घडलेल्या दहशवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन संजय कुमार यांनी केले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद व्यक्ती, संशयास्पद साहित्य आढळून आल्यास त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. प्रजासत्ताक दिनाला शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.