शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलाला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2016 03:40 IST

सुरतच्या एका रुग्णालयात १९ वर्षीय मुलाचा मेंदू मृतावस्थेत गेल्यावर त्याच्या पालकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला

मुंबई: सुरतच्या एका रुग्णालयात १९ वर्षीय मुलाचा मेंदू मृतावस्थेत गेल्यावर त्याच्या पालकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या १९ वर्षीय मुलाच्या हृदयदानामुळे मुंबईच्या १५ वर्षीय मुलाला जीवनदान मिळाले आहे. सुरत ते मुंबई दरम्यानचे ३१२ किमीचे अंतर अवघ्या १ तास ५० मिनिटांत कापून हृदय आणून सकाळी १० वाजून ३९ मिनिटांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू झाली. हे प्रत्यारोपण यशस्वी झाले असून मुलाला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. सहाव्या लहान मुलावर हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सुरतच्या आयुष आयसीयू अ‍ॅण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १९ वर्षीय मुलाला डोक्याला मार लागल्यामुळे दाखल केले होते. त्याचा मेंदू मृतावस्थेत गेल्यावर त्याच्या पालकांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. हृदय फोर्टिस रुग्णालयात आणण्यात आले. १५ वर्षीय मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून प्रतिक्षा यादीत होता. गेल्या एका वर्षापासून रिस्ट्रिक्टेड कार्डिओमायोपॅथी आजाराने ग्रस्त होता. त्याला हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता. पण, त्याला हृदय मिळत नव्हते. शनिवारी रात्री हृदय मिळू शकते अशी कल्पना आल्यावर रुग्णालयाने तयारी सुरू केली होती. सुरतच्या रुग्णालयातून सकाळी ८.५०ला हृदय घेऊन डॉक्टर निघाले. सकाळी १० वाजून ३९ मिनिटांनी हृदय फोर्टिसमध्ये पोहचले. लहान मुलांचे हृदयशल्यचिकित्सक डॉ. विजय अग्रवाल यांनी हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. (प्रतिनिधी)