शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा दुहेरी भुयारी मार्गासाठी मुख्यमंत्री १५ दिवसांत बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:34 IST

पुणे महानगरपालिका आणि बांधकाम विभाग दोन्ही प्रशासनामध्ये संभ्रम असल्याने नक्की काम कोणी करायचे या संदर्भात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील पंधरा दिवसांत बैठक घेणार

पुणे : शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या पेठांमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने सध्या अस्तित्वात असणारे रस्ते अपुरे पडत आहेत. वाहतूक कोंडीवर दूरगामी उपाययोजना करण्यासाठी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबागच्या ते शनिवारवाडा दुहेरी भुयारीमार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास अधिकाऱ्यांकडून विलंब होत असल्याकडे आमदार हेमंत रासने यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून लक्ष वेधले. यावेळी येत्या पंधरा दिवसांमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात बैठक घेणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.            हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार हेमंत रासने यांनी भुयारी मार्ग प्रकल्पाच्या डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यात होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनात झालेल्या बैठकीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेला हा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले. या दोन्ही विभागांच्या असमन्वयामुळे प्रकल्प आराखडा तयार करण्यास विलंब होत असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले.

"यशदामध्ये शहराच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत भुयारी मार्गांचा प्रकल्प अहवाल महापालिकेला तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र महापालिकेने आपल्याकडे ही यंत्रणा नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तो तयार करण्याचे पत्र दिले. दोन्ही प्रशासनामध्ये संभ्रम असल्याने नक्की काम कोणी करायचे या संदर्भात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील पंधरा दिवसांत बैठक घेणार आहेत" अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली.

गणेशोत्सव मंडळांवर दाखल खटले मागे घ्या

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये काही मंडळाकडून ध्वनिक्षेपकांची मर्यादा ओलांडण्यात आल्याने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र काही मोजक्या मंडळाकडून उल्लंघन झाले असताना अडीचशे ते तीनशे मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेश मंडळाचे कार्यकर्ते हे गणेशोत्सवासाठी वर्षभर मेहनत घेत असतात. काही लोकांच्या चुकीची शिक्षा सर्वांना होणे अन्यायकारक आहे. सरकारने कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करत गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी देखील हेमंत रासने यांनी सभागृहात केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: CM to meet on twin tunnel project in 15 days.

Web Summary : Chief Minister to discuss Pune's Saturday Wada-Swargate twin tunnel project delay. Coordination issues between departments stall progress. Ganesh mandals' noise violation cases to be reviewed.
टॅग्स :Puneपुणेshanivar wadaशनिवारवाडाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाUday Samantउदय सामंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार