दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते; अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:23 IST2026-02-20T19:23:10+5:302026-02-20T19:23:44+5:30

ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना भुजबळ यांच्या सारखा एक वरिष्ठ नेता संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती

Chhagan Bhujbal was going to go to Rajya Sabha after the merger of both NCPs; Amol Kolhe's revelation | दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते; अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते; अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट

पुणे: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकाराशी बोलताना केला.

छगन भुजबळ हे खूप मोठे नेते आहेत, त्यामुळे मी त्यांचा त्रागा समजू शकतो, कारण जी काही आधी चर्चा झाली होती, विशिष्ट जातनिहाय जनगणना होत असताना, ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना भुजबळ यांच्या सारखा एक वरिष्ठ नेता संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. या संदर्भात अजित पवार यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झाली होती. त्यावेळी अजित पवार यांनी ओघाने सांगितलं होतं की कदाचित भुजबळसाहेब हे राज्यसभेवर असतील, अशी आमची अंतर्गत चर्चा झाली होती. आता मात्र सामाजिक प्रश्नांची इतकी जाण असणारा नेता राज्यसभेवर न जाता, कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा होत असेल, त्यामुळे कदाचित भुजबळ अस्वस्थ असतील, त्याबाबत मला कल्पना नाही असेही खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Web Title: Chhagan Bhujbal was going to go to Rajya Sabha after the merger of both NCPs; Amol Kolhe's revelation