शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्गावरील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी

By admin | Updated: July 5, 2015 00:26 IST

वारीदरम्यान पिण्याच्या पाण्याची तसेच इतर सुविधा चांगल्या पद्धतीने देता याव्यात, यासाठी पुरंदर पंचायत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भगवंत पवार

सासवड : वारीदरम्यान पिण्याच्या पाण्याची तसेच इतर सुविधा चांगल्या पद्धतीने देता याव्यात, यासाठी पुरंदर पंचायत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भगवंत पवार व गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवस पालखी महामार्गाशेजारील पाण्याच्या सर्व स्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी वारीसाठी रविवारी (दि. १२) सासवड येथे मुक्कामी येत आहे. तसेच गुरुवारपर्यंत (दि. १६) पालखी पुरंदर तालुक्यात आहे. या काळात झेंडेवाडी ते नीरा या पालखी मार्गावरील पिण्याच्या पाण्याचे जे स्रोत आहेत. त्याचे सर्व नमुने तपासणीसाठी दिले असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली. या वेळी आरोग्य सहायक संजय शिंदे, आरोग्य पर्यवेक्षक अशोक दोडके, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.ज्या विहिरींवरून पिण्याच्या पाण्याचे टँकर भरून देणार आहेत त्या ठिकाणी आरोग्य विभागाचा कमर्चारी टीसीएल पाहणीसाठी २४ तास कार्यरत असणार आहे. तसेच पालखी मार्गावरील गावातून मोफत मदर सोल्युशनचे वाटप करण्यात येणार आहे. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणाच्या माध्यमातून २ जुलैपासून घरोघरी डेंगी तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच विविध आजारांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. १० व ११ जुलै रोजी धुराळणी करण्यात येणार आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अशोक राजगीर यांच्या मार्गदर्शनाखाली धुराळणी करण्यात येणार आहे. तर मार्गावरील ग्रामपंचायतींनी टीसीएल खरेदी करून ठेवली आहेत. पालखीअगोदर पाच दिवस हे टीसीएल स्रोत असणाऱ्या ठिकाणी टाकले जाईल. भोर येथून अतिरिक्त कमर्चारी बोलाविले जातील, असे डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले. (वार्ताहर)