शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा विक्रीत वितरकाकडून फसवणूक

By admin | Updated: July 2, 2014 01:45 IST

शहरातील अधिकृत रिक्षा वितरकांकडून रिक्षाच्या मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे

पुणे : शहरातील अधिकृत रिक्षा वितरकांकडून रिक्षाच्या मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. गेल्या ३ वर्षांत शेकडो रिक्षांची विक्री या वितरकाने केली असल्याने रिक्षाचालकांची मोठी फसवणूक झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित वितरकास कारणे दाखवा नोटीस बजावून व्यवसाय प्रमाणपत्र निलंबित का करू नये, याची विचारणा आरटीओकडून करण्यात आली आहे.नाना पेठेतील मनीधारी मोटार्स या वितरकाकडून मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम घेण्यात येत असल्याची, तसेच रिक्षाबरोबर इलेक्ट्रॉनिक मीटर घेण्याची सक्ती केली जात असल्याची तक्रार पुणे शहर व जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संजय कवडे यांनी डिसेंबर २०१३ मध्ये आरटीओकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर अंकुश शितोळे, प्रदीप टेकाळे यांच्याही त्यांच्याविरुद्ध तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर मोटार वाहन निरीक्षक सुनील म्हेत्रे यांनी या तक्रारींची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल आरटीओकडे सादर केला आहे.रिक्षाच्या एकाच मॉडेलच्या किमतीमध्ये फरक आढळून येतो, राष्ट्रीयीकृत बँक कर्ज योजनेच्या नावाखाली ६ हजार रुपयांची रक्कम जास्त घेतली जात असल्याचे पुरावे तक्रारदाराकडून सादर करण्यात आले होते. चौकशीमध्ये एकाच मॉडेलच्या टॅक्स इनव्हॉईसमध्ये १४८६ रुपयांचा फरक दिसून येतो, तसेच मणिधारी मोटार्स यांच्याकडील इनव्हाईसमध्ये ६ हजारांचा फरक दिसून येतो. १५५० रुपये सर्व्हिस चार्जेस घेतले जातात, असे आढळून आल्याचे नमूद केले आहे.शोरूमच्या दर्शनी भागामध्ये रिक्षाची मूळ किंमत, व्हॅट व इतर कर, विमा रक्कम, इतर चार्जेस, इलेक्ट्रॉनिक मीटरची किंमत, तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर खरेदी करण्याची सक्ती नसल्याचा फलक लावावा, असा अभिप्राय त्या अहवालामध्ये देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)