शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आज रात्री उशिरा पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 19:39 IST

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाप्रमाणे शहराला आजही पावसाने झोडपण्याची शक्यता मुंबई हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र कालप्रमाणे संध्याकाळी नाही तर रात्री उशिरा हा पाऊस पडणार असल्याचे त्यात म्हटले आहे. 

पुणे : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाप्रमाणे शहराला आजही पावसाने झोडपण्याची शक्यता मुंबई हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र कालप्रमाणे संध्याकाळी नाही तर रात्री उशिरा हा पाऊस पडणार असल्याचे त्यात म्हटले आहे. 

बुधवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने पुणे शहराला झोडपून काढले होते. अवघ्या ४० मिनिटांच्या पावसात संपूर्ण शहरात झाडपडीच्या घटना आणि पाणी तुंबण्याची उदाहरणे बघायला मिळाली. हा परतीचा पाऊस आहे असेही हवामान खात्याने जाहीर केले आहे. अखेर आजही पाऊस येणार असून पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.  सलग ५ दिवस पाऊस नसणे, हवेतील आद्रता कमी होत जाणे, हवेचे अँटी चक्रवात अभिसरण अशा काही निकष पूर्ण केल्यानंतर मॉन्सूनने माघारीचा प्रवास सुरु केला असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर केले जाते़ त्यानुसार आज मॉन्सूनने हे सर्व निकष पूर्ण केल्याने हवामान विभागाने मॉन्सूने परतीचा प्रवास सुरु केल्याचे जाहीर केले आहे़.

 या पावसात गाडी वेगाने चालवणे धोकादायक आहे. कारण अशा पावसात दृश्यमानता कमी झालेली असते. त्यात झाडांच्या भोवती माती ओली असल्याने झाडे पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे गाड्याही झाडांखाली पार्क करणे टाळावे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर