शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्गावर चक्का जाम

By admin | Updated: August 30, 2015 02:59 IST

कुंभमेळा, रक्षाबंधन आणि शनिवार-रविवारची जोडून आलेली सुटी असा तिहेरी ताण वाहतुकीवर आल्याने पुणे-नाशिक महामार्गावर आज चक्का जाम झाले. या मार्गावर दिवसभर

राजगुरुनगर : कुंभमेळा, रक्षाबंधन आणि शनिवार-रविवारची जोडून आलेली सुटी असा तिहेरी ताण वाहतुकीवर आल्याने पुणे-नाशिक महामार्गावर आज चक्का जाम झाले. या मार्गावर दिवसभर वाहतूककोंडी होती. एक-एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्याहून राजगुरुनगरला पोहोचण्यासाठी लोकांना चार तासांचा कालावधी लागत होता. कुंभमेळ्यात आज शाही स्नान असल्यामुळे पुण्याकडून नाशिकला जाणऱ्या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. सकाळी ११ वाजल्यापासूनच वाहतूककोंडीला सुरुवात झाली. पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करूनही वाहतूककोंडी होतच होती. मुळातच अरुंद असलेल्या भीमा नदी आणि गावातील ओढा या ठिकाणांच्या दोन पुलांमुळे आणि त्याचवेळी राजगुरुनगरकडे वळणाऱ्या रस्त्यांमुळे वाहतूककोंडी होत होती. टोलनाका ते डाकबंगला हे दोन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासभर वेळ जात होता. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक अक्षरश: वैतागले होते. एसटी, बस आणि खासगी वाहनाने येणारे लोक राजगुरुनगरकर चांडोलीला उतरून पायी गावात येत होते. चाकणला राजगुरुनगरपेक्षाही गंभीर परिस्थिती असल्याने काल आणि आज पुण्याहून राजगुरुनगरला पोहोचायला लोकांना चार-चार तास लागले. सुदैवाने घाटात काही गंभीर समस्या उद्भवली नसल्याने हळूहळू का होईना वाहतूक सरकत राहिली. अन्यथा सगळा रस्ताच बंद होण्याची वेळ आली असती. रात्री या महामार्गावर अवजड कंटेनर जात असतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांना दिवस-रात्र कामावर हजर राहावे लागले. सलग कामामुळे तेही वैतागले होते. खड्ड्यांनी घेतलाएकाचा बळीनाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी एकाचा जीव घेतला आहे. शुक्रवारी रात्री पुणे - नाशिक महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत मोटारसायकल खड्ड्यात आदळून तीन जण रस्त्यावर फेकले गेले. त्यातील प्रशांत लक्ष्मण गाढवे (वय ३७, रा. सावरगाव) यांचा मृत्यू झाला, तर संजय श्रीधर वारुळे, विलास रामचंद्र पवार हे दोघे जखमी झाले आहेत. भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, गोकुळ भालेराव यांनी जखमींना उपचारासाठी हलविले. दरम्यान, महामार्गावरील या खड्ड्याने या तरुणाचा जीव घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील हा धोकादायक खड्डा बुजवून टाकला. अपघातातील एक जण हेल्मेटमुळे वाचला. मात्र, हेल्मेटचा चक्काचूर झाला. जयसिंंग रमाजी गाढवे, (रा. सावरगाव, घाडगेवाडी) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी मोटारसायकलचालक विलास रामचंद्र पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. पी. डमाळे करीत आहेत.