शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांवर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: August 6, 2015 23:27 IST

तलाठी गैरहजर असतात, अशा तक्रारी आल्यानंतर या मनमर्जीला चाप लागावा म्हणून वसई महसूल विभागाने तलाठी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रीक मशीन

वसई : तलाठी गैरहजर असतात, अशा तक्रारी आल्यानंतर या मनमर्जीला चाप लागावा म्हणून वसई महसूल विभागाने तलाठी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रीक मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तलाठ्यांना १० ते १ च्या दरम्यान आपल्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. कार्यालये उघडली जात नाहीत, ते वेळेवर कार्यालयांत येत नाहीत, अशा अनेक तक्रारी ग्रामीण भागातून आल्यानंतर प्रांताधिकारी डॉ. दादा दातकर व तहसीलदार सुनील कोळी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयांतील वस्तुस्थिती प्रांताधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना समजू शकणार आहे. तसेच सरकारी गोदामांमध्ये आलेले धान्य, दुकानदारांना केलेले वितरण व गोदामातील उर्वरित साठा या तिन्हींची माहिती शिधापत्रिकाधारकांना मिळावी, याकरिता एसएमएस, वेबसाइटवरील माहितीच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.यासंदर्भात अधिक माहिती देताना प्रांताधिकारी डॉ. दादा दातकर म्हणाले, या प्रक्रियेमध्ये आम्ही स्थानिक ग्रामस्थांनाही सहभागी करून घेत आहोत. एखाद्या दुकानदाराला किती धान्य मिळाले, याची माहिती एसएमएसद्वारे मिळाल्यानंतर ग्राहकांनी दुकानदारांकडे त्याची खात्री करावी व आलेले धान्य दुकानदार योग्य प्रमाणात वितरीत करतो का, यावर लक्ष ठेवावे, असा प्रयत्न आहे. यामुळे या यंत्रणेतील उणिवा काही प्रमाणात दूर होतील, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे.