पालखी मार्गावर राहणार सीसीटीव्हीची नजर

By Admin | Updated: June 13, 2015 22:41 IST2015-06-13T22:41:37+5:302015-06-13T22:41:37+5:30

पालखी तळावर या वर्षीपासून कायमस्वरूपी सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. महापालिकेकडून पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा

CCTV footage will remain on Palkhi road | पालखी मार्गावर राहणार सीसीटीव्हीची नजर

पालखी मार्गावर राहणार सीसीटीव्हीची नजर

पुणे : पालखी तळावर या वर्षीपासून कायमस्वरूपी सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. महापालिकेकडून पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा मंदिराच्या परिसरात सुमारे ३२ कायमस्वरूपी सीसीटीव्ही उभारले आहेत. हे काम नुकतेच पूर्ण झाले असल्याने पालखीतळासाठी कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी पालखी निमित्ताने तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही लावले जात होते.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा भवानीपेठेतील या दोन मंदिरांमध्ये मुक्कामी असतो. या निमित्ताने लाखो वारकरी या मंदिराच्या परिसरात वास्तव्यास असतात. तर पुणे शहर आणि हद्दीजवळील गावांमधील शेकडो भाविकही दर्शनासाठी या दोन्ही मंदिरात गर्दी करतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून या दोन्ही मंदिराच्या परिसरात कायस्वरूपी सुरक्षाव्यवस्था असण्याच्या उद्देशाने या परिसरात ३२ सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पोलीस बंदोबस्तही चोख असणार आहे. (प्रतिनिधी)

बाराशे सीसीटीव्ही बसविले
-शहराच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम वेगाने सुरू असून शहरात आत्तापर्यंत जवळपास १२०० कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यात पालखी मार्गाचाही बहुतांश प्रमाणात समावेश आहे.
-या सीसीटीव्हींचे प्रक्षेपणही सुरू असून, त्याचा एक नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्त कार्यालयात आहे. लवकरच दुसरा कक्ष महापालिकेतही सुरू होणार आहे. त्यामुळे पालखी मुक्कामी असणाऱ्या मंदिरांबरोबरच या वर्षी पालखी मार्गावरही पोलिसांची नजर राहणार आहे.

Web Title: CCTV footage will remain on Palkhi road