शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही केबलची खोदाई पुन्हा रखडणार

By admin | Updated: May 29, 2014 05:23 IST

राज्य शासनाच्या वतीने शहराच्या सुरक्षेसाठी विविध भागांत सीसीटीव्ही उभारण्यात येत आहेत.

पुणे : राज्य शासनाच्या वतीने शहराच्या सुरक्षेसाठी विविध भागांत सीसीटीव्ही उभारण्यात येत आहेत. परंतु, पावसाळ्याच्या तोंडावर सीसीटीव्ही केबल खोदाईला महापालिकेने नकार दिला असून, केवळ ओव्हरहेड केबलला परवानगी दिली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध चौकांत व प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांभोवती खोदाई शुल्क माफ करून सीसीटीव्ही केबलसाठी खोदाई सुरू होती. परंतु, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने १५ एप्रिलपासूनच शहरातील रस्त्यांवर खोदकामास मनाई केली. शहरांत सीसीटीव्हीसाठी रस्ते खोदाई करताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे, केबलसाठीही पालिकेने खोदाईची परवानगी तातडीने थांबविली होती. मात्र, गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत सीसीटीव्ही केबलसाठी एक महिन्याची मुदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, मॉन्सूनपूर्व वळवाच्या पावसाने पुण्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे रस्त्याभोवतीची खोदाई तातडीने थांबणे गरजेचे आहे. अंदमानात धडकलेला मॉन्सून जूनच्या पहिल्या अथवा दुसर्‍या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खोदाईमुळे रस्त्यावर खड्ड्यांची समस्या पुन्हा उद्भवू शकते. त्यामुळे महापालिकेने सीसीटीव्हीसाठी खोदाईची परवानगी अद्याप दिलेली नाही. मात्र, दरम्यानच्या काळात ओव्हरहेड केबलला महापालिकेची कोणतीही हरकत नसल्याचे पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.(प्रतिनिधी)