शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कारचा ताबा सुटल्याने बसला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, पुणे-नाशिक महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:12 IST

अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून दोन्ही टायर फुटल्याचेही समोर आले आहे

मंचर: पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळील एकलहरे गावच्या हद्दीत रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि सासू अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत.

 मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन शिवराम आंबेगावे (रा.पिंपरी, पुणे) हे आपल्या कुटुंबासह नाशिकहून पुण्याकडे कारने येत होते.एकलहरे गावाजवळ कारचा ताबा सुटल्याने ती डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या बसला धडकली. या भीषण धडकेत चालक मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे(वय ४६),त्यांची पत्नी आरती मल्लिकार्जुन आंबेगावे (वय ४२) आणि सासू लता बाळू तूपलोंढे (वय ६३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा प्रेम मल्लिकार्जुन आंबेगावे (वय २०) आणि मुलगी मृणाल मल्लिकार्जुन आंबेगावे (वय १६) ही दोन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून दोन्ही टायर फुटल्याचेही समोर आले आहे. बसच्या पुढील बाजूचे भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मागून आलेल्या वाहनाने हूल दिल्याने किंवा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान,मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघात कशामुळे झाला याचा पुढील तपास सुरू आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच या गाडीमधून धूर येत असल्याने तेथील व्यक्तींनी बॅटरीच्या वायर बाजूला केल्या व तत्काळ मदत मिळावी म्हणून रुग्णवाहिकेला फोन केला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Car Crash on Pune-Nashik Highway Kills Three from Family

Web Summary : A horrific accident on the Pune-Nashik highway claimed three lives from one family. The car crashed into a bus near Manchar, killing a couple and the wife's mother. Two children were seriously injured and are receiving treatment. The cause is under investigation.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूcarकारFamilyपरिवारhighwayमहामार्गhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस