कारची जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी, यवतजवळ भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:34 IST2025-08-21T16:33:58+5:302025-08-21T16:34:35+5:30

अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार चालकाचा रक्त नमुना घेतला असून तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, यावरून त्याने मद्यप्राशन केले की नाही, याबाबत खुलासा होणार

Car collides head-on; Two die on the spot, one seriously injured, horrific accident near Yavat | कारची जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी, यवतजवळ भीषण अपघात

कारची जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी, यवतजवळ भीषण अपघात

यवत : पुणे-सोलापूर महामार्गावर यवत (ता. दौंड) येथे काल (दि. २०) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात लाल रंगाच्या स्विफ्ट कार चालकावर बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात अशोक विश्वनाथराव थोरबोले (वय ५७, रा. उरळी कांचन, मूळ गोजवडा, ता. वाशी, जि. धाराशिव), गणेश धनंजय दोरगे (वय २८, रा. यवत रावबाचीवाडी, ता. दौंड) यांचा मृत्यू झाला आहे. तर 

अपघातात मृत्यू पावलेल्या अशोक थोरबोले यांचे भाऊ ज्ञानेश्वर थोरबोले यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी राकेश मारुती भोसले याच्याविरुद्ध भादंवि कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४)(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले (वय ४९, रा. उरळी कांचन), राकेश मारुती भोसले (स्विफ्ट चालक, रा. बोरीभडक, ता. दौंड) , सचिन रमेश दोरगे (रा. यवत, ता. दौंड) , वैभव रमेश दोरगे (रा. यवत, ता. दौंड) , हृषीकेश बाळासाहेब जगताप हे जखमी झाले आहेत. 
            
यवत गावाजवळील शेरू हॉटेलसमोर महामार्गावर लाल रंगाच्या स्विफ्ट कारने (एम एच १२ वाय डब्ल्यू.५०५२ ) भरधाव वेगात डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर ( एम एच १२ टी वाय ७५३१ ) ला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की स्विफ्ट डिझायर कारमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात आणखी एका वाहनाला (एम एच १२ एन यू. ५५०१) देखील धडक बसून मोठे नुकसान झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवून रहदारी नियमांचे उल्लंघन केले व हा अपघात घडवून आणला. अपघातात तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या स्विफ्ट कार चालकाचा रक्त नमुना घेतला असून तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर चालकाने मद्यप्राशन केले होते की नाही, याबाबत खुलासा होणार आहे.

Web Title: Car collides head-on; Two die on the spot, one seriously injured, horrific accident near Yavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.