शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांनो, मतदारांना नमस्कार पडेल महागात

By admin | Updated: February 20, 2017 02:27 IST

ओळखीचा असो वा नसो, मतदार दिसले, की राजकारणी व्यक्तींद्वारा नमस्कार करण्याचा मोह आवरणे कठीण होते.

कान्हूर मेसाई : ओळखीचा असो वा नसो, मतदार दिसले, की राजकारणी व्यक्तींद्वारा नमस्कार करण्याचा मोह आवरणे कठीण होते. त्यातच निवडणुका म्हटल्या, की उमेदवारांचे हात जोडलेलेच असतात. मात्र, या मोहाला आता आवर घालावा लागणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात उमेदवारांना मात्र नमस्काराला विसरावे लागणार आहे. मतदान केंद्र परिसरात उमेदवाराने मतदाराला नमस्कार करणे हा प्रचाराचा भाग समजला जाणार आहे. या ठिकाणी उमेदवाराने मतदाराला नमस्कार केल्यास त्या उमेदवारावर पोलीस कारवाई होऊ शकते. हादेखील आचारसंहिताभंगाचा भाग समजण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या वेळी या विषयीचे निर्देश आयोगाने दिले होते. अर्थात, याबाबत कुठेही कारवाई झाली नसली, तरी हेच नियम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कायम असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले. उमेदवारांना मतदान केंद्रात प्रवेश करण्याची जी मुभा दिली आहे, त्याचा अनेक ठिकाणी गैरवापर होतो किंबहुना, केला जातो. त्यामुळे मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत उमेदवार असला, तरी त्याला स्वत:ची ओळख विसरावी लागणार आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत उमेदवाराने मतदारांना स्वत:ची ओळख करून देणे, मतदाराच्या रांगेजवळ जाऊन चौकशी करणे, स्वत:चा परिचय देणे, नमस्कार करणे किंवा मतदान केंद्रात वाजवीपेक्षा अधिक वेळ थांबणे या सर्व प्रकाराला त्याला आवर घालावा लागणार आहे. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत कोणत्याही व्यक्तीला उमेदवाराने स्वत:ची ओळख करून देऊ नये व नमस्कार करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मतदान सुरू असताना आमदार, खासदारांद्वारा मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी फिरल्या जात असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आयोगाने या प्रकारालाही मनाई केली आहे. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदारांना केवळ संबंधित केंद्रावर, मतदान केंद्रावर फक्त मतदान करण्यासाठीच जाता येणार आहे़