शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांना लुटून बिल्डर मालामाल

By admin | Updated: July 4, 2014 06:45 IST

गुंठा, अर्ध्या गुंठ्यात बांधकाम केलेले संकटात जसे सापडले, तसेच अनधिकृत गृहप्रकल्पांमध्ये सदनिका खरेदी केलेलेही फसले.

संजय माने, पिंपरीगुंठा, अर्ध्या गुंठ्यात बांधकाम केलेले संकटात जसे सापडले, तसेच अनधिकृत गृहप्रकल्पांमध्ये सदनिका खरेदी केलेलेही फसले. आरक्षित जागेत पूर नियंत्रण रेषेत, विनापरवाना गृहप्रकल्प राबविले आणि स्वस्तात विकून मोकळे झाले. नंतर मात्र कारवाईचा हातोडा पडून सदनिकाधारक बेघर झाले. बिल्डर मात्र नामानिराळा राहून मालामाल झाला. अशी असंख्य उदाहरणे या शहरात सापडतात.किती दिवस चाळीत, भाड्याच्या घरात राहायचे? स्वत:चे हक्काचे घर असावे, या उद्देशाने कर्जबाजारी होऊन अनेकांनी घराचे स्वप्न बाळगले. बिल्डरला सदनिकेची रक्कम अदा केली. बांधकाम शेवटच्या टप्प्यात आलेले. लवकरच ताबा मिळणार, नव्या घरात प्रवेश करणार या आनंदात असतानाच इमारत अनधिकृत असल्याने महापालिकेची कारवाई झाली. राहण्यास जाण्यापूर्वीच डोळ्यांदेखत नवी इमारत कोसळली. हा धक्का अनेकांना उद्ध्वस्त करणारा ठरला. मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये सदनिका घेणे आवाक्याबाहेर असल्याने कमी किमतीत ज्या ठिकाणी सदनिका मिळते, अशा सदनिका खरेदी करण्यास अनेकांनी पसंती दिली. सर्व कागदपत्रे उपलब्ध नसल्याने राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज मिळणे अशक्य होते. त्यामुळे खासगी वित्तसंस्था, सहकारी बँकेचा पर्याय त्यांनी स्वीकारला. व्याजदर अव्वाच्या सव्वा असूनही सहकारी बँका, खासगी पतसंस्थांमधून कर्ज घेण्याचा पर्याय स्वीकारणे त्यांना भाग पडले. आता घर मिळण्यापूर्वीच इमारत कोसळली, तरी सहानुभूती म्हणून त्यांची कर्जाच्या परतफेडीतून सुटका झालेली नाही. वित्तसंस्थांनी त्यांच्याकडे कर्जाच्या हप्ते वसुलीसाठी तगादा लावला आहे.अनेक इमारती महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईत जमीनदोस्त झाल्या. काही इमारती महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षणाच्या जागेवरील होत्या, तर काही पूरनियंत्रण रेषेत येत होत्या. काही बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेचा बांधकाम परवानाच घेतला नव्हता. बांधकामाचे नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे या इमारती उभारण्यात आल्या होत्या. व्यावसायिक उद्देशाने उभारलेल्या या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने प्राधान्याने कारवाई केली. कमी किमतीत मिळते म्हणून अनेकांनी बांधकाम अधिकृत आहे, की नाही याची खातरजमा न करता सदनिका खरेदी करण्याची जोखीम पत्करली होती.