शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

टक्केवारीमुळे बिल्डर मेटाकुटीस

By admin | Updated: October 12, 2015 01:38 IST

बांधकामांसाठी लागणाऱ्या परवानगीसाठी ‘टक्केवारी’च्या रुपाने होणारा भष्ट्राचार हाच महापालिकेत शिष्टाचार बनल्याने बांधकाम व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत़

पुणे : बांधकामांसाठी लागणाऱ्या परवानगीसाठी ‘टक्केवारी’च्या रुपाने होणारा भष्ट्राचार हाच महापालिकेत शिष्टाचार बनल्याने बांधकाम व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत़ प्रती चौरस फुटाच्या हिशेबाने घेतल्या जाणाऱ्या या टक्केवारीमुळे बांधकामाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढत आहे़ ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) हे अडवणुकीचे हत्यार बनले आहे़महापालिकेच्या बांधकाम विभागामध्ये बोकाळलेल्या लाचखोरीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने बांधकाम व्यावसायिक चांगलेच हवालदिल झाले आहेत. सध्या मंदीचे वातावरण असल्याने सदनिकांच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला असताना पालिकेत द्यायच्या टक्केवारीत मात्र वाढच होत आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांना ठाणे पालिकेकडून बांधकाम परवाने मिळविण्यासाठी अधिकारी व नगरसेवकांनी मोठा त्रास दिल्याने परमार यांनी सुसाईट नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याचा निषेध करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेकडून पुणे महापालिकेवर मंगळवार, १३ आॅक्टोबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे. तसेच यादिवशी संपूर्ण शहरात बंद पाळला जाणार आहे.बांधकाम व्यावसायिकांना अनेक खात्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकामाला विलंब होतो. लवकर परवानगीसाठी अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. फाइल सबमिट करण्यापासून याची सुरुवात होते. त्यानंतर प्लॅन तपासणी, सिटी सर्व्हेकडून सीमा रेषांची आखणी, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रेनहार्वेस्टिंग, अग्निशमन, लिफ्ट, उद्यान विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागते. डीसी रूलमधील किचकट नियम दाखवून परवानगी रखडवून ठेवली जाते.